

EPFO चा नवीन नियम
आता नोकरी बदलल्यावर आपोआप होणार पीएफ ट्रान्सफर
पीएफ ट्रान्सफरसाठी नियोक्त्याची गरज नाही
कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा केले जातात. दरम्यान, जेव्हा तुम्ही नोकरी बदलता तेव्हा पीएफ खाते ट्रान्सफर करणे गरजेचे असते. पीएफ खाते ट्रान्सफर करण्यासाठी खूप मोठी प्रोसेस असते. मात्र, आता यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता ईपीएफओने नवीन ऑटोमॅटिक ट्रान्सफर सिस्टीम आणली आहे. यामुळे पीएफ खाते ट्रान्सफर करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. ईपीएफओच्या या निर्णयामुळे ८ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
EPFO चा नवीन नियम (EPFO New Rule)
ईपीएफओचा हा नियम लागू झाल्यानंतर आता तुम्हाला पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी कोणत्याही ऑनलाइन क्लेम किंवा अर्जाची गरज भासणार नाही. तुमचं हे काम ऑटोमॅटिक होणार आहे. सध्या जर एखाद्या कर्मचाऱ्याने एका संस्थेतील नोकरी सोडली तर त्याला पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी नियोक्त्यावर अवलंबून राहावे लागत होते. अनेकदा नियोक्त्याने मंजुरी देण्यास उशिर केल्यामुळे कर्मचाऱ्याचे पैसे लवकर ट्रान्सफर होत नव्हते.
आपोआप होणार पीएफ ट्रान्सफर (Now PF Transfer Automatically)
आता या नवीन नियमानुसार, पीएफ ट्रान्सफरच्या प्रोसेसमध्ये नियोक्त्याचे काहीही काम नसणार आहे. तुम्ही नवीन कंपनी जॉइन केल्यावर सिस्टीम आपोआप जुन्या पीएफ बॅलेंसला नवीन पीएफ खात्यात ट्रान्सफर करेल. यामुळे तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही.
फॉर्म १३ ची गरज नाही
पीएफ ट्रान्सफर करण्याची प्रोसेस खूप किचकट होती. कर्मचाऱ्यांना फॉर्म १३ भरावा लागत होता. त्यानंतर अनेक आठवडे वाट पाहावी लागत होती. अनेकदा माहिती मॅच न झाल्याने क्लेमदेखील रिजेक्ट होत होता. मात्र, आता असं काहीही होणार नाही. तुम्हाला कोणतेही कागदपत्र अपलोड करण्याची गरज भासणार नाही. तसेच पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.