

कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना आता पीएफचे पैसे काढताना येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. कारण पुर्वी नोकरी बदलताना किंवा पीएफचे पैसे काढताना बरेच दिवस वाट पाहायला लागची.
मात्र आता यामध्ये तुम्हाला UPI च्या मदतीने तुम्हाला पैसे काढता येणार आहेत. ही मोठी अपडेच काहीच दिवसांपुर्वी देण्यात आली होती. यामध्ये आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कधीपासून तुम्हाला याचा लाभ घेता येईल? याची तारिख समोर आली आहे. पुढील बातमीत आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
EPFOचे सदस्य लवकरच त्यांच्या UPI अकाउंटमधून त्यांची जमा रक्कम काढू शकणार आहेत. याची सुरुवात एप्रिल २०२६ मध्ये होणार आहे. असं मनी कंट्रोल अधिकृत वेबसाइटवर एका वरिष्ठ PTI अधिकार्याने सांगितले आहे. यामध्ये कामगार मंत्रालया अंतर्गत EPFचा काही भाग युपीआय द्वारे मिळणार नाही. तर काही मिळू शकेल. कर्मचारी आपल्या बॅंक खात्यातून लिंक UPI पिनचा वापर करुन पैसे त्यांच्या खात्यात ट्रान्सफर करु शकणार आहेत. जेव्हा हे पैसे तुमच्या खात्यात येतील तेव्हा तुम्हाला डिजीटल पेमेंटच्या मदतीने काढता येणार आहेत.
सध्या लोक भाजी घेण्यापासून ते घर घेण्यापर्यंत UPI पेमेंटचा वापर करतात. त्यामुळे ही सुविधा कर्मचाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफलाइन फॉर्मची आवश्यकता लागत नाहीत.
जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत पाच वर्षे सेवा पूर्ण केली आणि त्याने त्याचा पीएफ काढला, तर तो किंवी ती व्यक्ती आयकर भरण्यास जबाबदार नसते. पाच वर्षांचा कालावधी एक किंवा अधिक कंपन्यांसह एकत्रित केला जाऊ शकतो. एकाच कंपनीत पाच वर्ष पूर्ण करणं आवश्यक नाही. एकूण तुमचा कार्यकाळ किमान पाच वर्षे असणे गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.