Sakshi Sunil Jadhav
उपवासानंतर खाण्यासाठी हलकं, पौष्टिक आणि चविष्ट असं काही हवं असेल तर शेवई फ्रूट कस्टर्ड हा उत्तम पर्याय ठरतो. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते.
1 कप पातळ भाजलेली शेवई, तूप, 2 कप दूध, 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर (व्हॅनिला फ्लेवर), 3 ते 4 टेबलस्पून साखर, 1 सफरचंद, 1 केळ, 8–10 द्राक्ष, 1/4 कप डाळिंबाचे दाणे, 8 ते 10 काजू, बदाम 1/2 टीस्पून वेलची पूड इ.
शेवई फ्रूट कस्टर्ड फक्त 20 ते 25 मिनिटांत तयार होते, त्यामुळे अचानक पाहुणे आले तरी सहज बनवता येते.
दूध, फळे आणि सुकामेवा यामुळे कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्त्वे मिळतात.
एका कढईत तूप घालून शेवया छान परता. मग त्यात साखर घालून पुन्हा परता.
आता एका भांड्यात कस्टर्ड पावडर, दूध मिक्स करा आणि हे मिश्रण कढईत घाला. त्यामध्ये वेलची पूड मिक्स करा.
मिश्रण थोडं घट्ट झालं की गॅस बंद करुन कस्टर्ड थंड करा. मग त्यात आवडती फळं बारिक करुन घाला.
शेवटी ड्रायफ्रूट्स घालून थंड करुन शेवई फ्रूट कस्टर्ड सर्व्ह करावे.