EPFO खातेधारकांना झटका! PFवरील व्याजदर कमी करण्याची शक्यता; पुढच्या महिन्यात होणार निर्णय

EPFO PF Interest Rate May Decrease: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएफ खात्यावरील व्याजदरात बदल केला जाऊ शकतो. पुढच्या महिन्यात सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक आहे.
EPFO
EPFO Saam Tv
Published On
Summary

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पीएफ खात्यावरील व्याजदर कमी होणार

पुढच्या महिन्यात निर्णय होण्याची शक्यता

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या पगारातील ठरावीक रक्कम दर महिन्याला पीएफ खात्यात जमा केली जाते. दरम्यान, पीएफ खात्यातील रक्कम ही गुंतवणूक असते. यावर तुम्हाला व्याजदर मिळते. पीएफ अकाउंटमधील पैसे ही सेवानिवृत्तीच्या किंवा अडचणीच्या काळात हे पैसे काढता येतात. दरम्यान, आता पीएफ कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. आता पीएफवर मिळणारे व्याजदर कमी होऊ शकते.

EPFO
EPFO: तुमची कंपनी PF खात्यात खरंच पैसे जमा करते का? EPFO ने घेतला मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांचे टेन्शन दूर होणार

पुढच्या महिन्यात निर्णय होणार

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची २३९वी बैठक आहे. दरम्यान २०२५-२६ साठी पीएफ डिपॉझिटसाठी व्याजदर ८ ते ८.२० टक्के होऊ शकते. सध्या पीएफ खात्यावरील व्याजदर ८.२५ टक्के आहे. हे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. ईपीएफओने मागच्या तीन वर्षात व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.मात्र, यावेळी व्याजदर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पुढच्या महिन्यात याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, ईपीएफओमध्ये अनेक सदस्य जोडले जात आहेत. दरम्यान, जास्त लोकांचे पेमेंट करण्यासाठी व्याजदर कमी होऊ शकतो. जेणेकरुन ईपीएफओला कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. दरम्यान, आता या व्याजदरासाठी अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच निर्णय घेतला जाणार आहे.

EPFO
EPFO: तुमची कंपनी PF खात्यात खरंच पैसे जमा करते का? EPFO ने घेतला मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांचे टेन्शन दूर होणार

वेतन मर्यादेवरही निर्णय होण्याची शक्यता

ईपीएफओची पुढच्या महिन्यात बैठक आहे. यामध्ये नवीन व्याजदर लागू केले जाऊ शकतात. याचसोबत ईपीएफओअंतर्गत सिक्युरिटी कव्हरेज वाढवण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. सध्याची वेतन मर्यादा १५,००० रुपयांवरुन २५,००० करण्याबाबतही विचार होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.

EPFO
EPFO New Rule: ८ कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PF लिमिट १५००० वरुन ₹२५००० होण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com