EPFO New Rule: ८ कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PF लिमिट १५००० वरुन ₹२५००० होण्याची शक्यता

EPFO PF limit May Increase: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आताा पीएफची लिमिट १५००० रुपयांवरुन २५००० होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
EPFO New Rule
EPFO New RuleSaam tv
Published On
Summary

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पीएफची रक्कम १५००० रुपयांवरुन २५००० होणार

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होणा फायदा

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा केले जातात. दरम्यान, ईपीएफओ सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ईपीएफओ सदस्यांच्या पीएफ कॉन्ट्रिब्युशनची सॅलरी १५००० रुपयांवरुन २५००० रुपये करण्याची शक्यता आहे.त्यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

EPFO New Rule
EPFO मध्ये मोठा बदल; पाच वर्ष असो की १०वर्ष झटक्यात मिळेल जुना PF नंबर; जाणून घ्या प्रोसेस

केंद्र सरकारने शेवटचे २०१४ मध्ये पीएफ कॉन्ट्रिब्युशनच्या लिमिटमध्ये बदल केला होता. ही लिमिट ६,५०० रुपयांवरुन १५००० रुपये केली होती. त्यानंतर आता पुन्हा ही लिमिट वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाढत्या महागाईमुळे ईपीएस स्कीमअंतर्गत पेन्शनची मिळणारी रक्कम खूप कमी असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बदल करण्याची मागणी होत आहे. सध्या ईपीएस ९५ अंतर्गत सेवानिवृत्त लोकांना कमीत कमी १००० रुपयांची पेन्शन मिळते. कामगार संघटना ईपीएसअंतर्गत ५००० रुपयांच्या पेन्शनची मागणी करत आहेत.

ईपीएफओअंतर्गत सॅलरी लिमिट १५,००० रुपये करण्यासाठी मागणी केली जात आहे. संसदेत झालेल्या हिवाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यासंदर्भात कामगार व रोजगार मंत्री मनसुख मांडवया यांनी माहिती दिली होती. यूनियन आणि इंडस्ट्रीज बॉडीसोबत स्टेकहोल्डर्सने दिलेला सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. याचा बदल टेक होम सॅलरी आणि कर्मचाऱ्यांवर होतो.

EPFO New Rule
EPFO: तुमची कंपनी PF खात्यात खरंच पैसे जमा करते का? EPFO ने घेतला मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांचे टेन्शन दूर होणार

EPF आणि EPS कसं कॅल्क्युलेट होतं?

संघटित क्षेत्रात कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीतील १२ टक्के रक्कम ईपीएफ अकाउंटमध्ये जमा केली जाते. याचसोबत नियोक्तादेखील तेवढीच रक्कम जमा करतात. परंतु त्यातील काही रक्कम ही पीएफ आणि काही रक्कम पेन्शनमध्ये जमा होते. नियोक्त्याच्या १२ टक्के रक्कमेतील ३.६७ टक्के रक्कम कर्मचाऱ्याच्या पीएख अकाउंटमध्ये जमा केली जाते. तर ८.३३ टक्के रक्कम पेन्शन स्कीममध्ये जमा केली जाते.

EPFO New Rule
Pension Hike: महत्त्वाची बातमी! EPFO कर्मचार्‍यांची पेन्शन ₹६५००नी वाढणार? सरकारने एका झटक्यात विषय संपवला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com