EPFO ने PF संदर्भात मोठा बदल केला आहे.
2014 पूर्वी नोकरी केलेल्यांना जुना PF नंबर सहज मिळणार.
आता PF नंबर मिळवण्याची प्रक्रिया खूप सोपी करण्यात आली आहे.
खासगी क्षेत्रातील कंपनीत काम करणाऱ्यांसाठी पीएफ ही एक प्रकारची बचत आहे. ही रक्कम गरजेच्या वेळी खूप उपयुक्त ठरते. पण खासगी नोकरीमध्ये एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीत नोकरी बदलली जाते. या दरम्यान सर्वात आधी ज्या कंपनीमध्ये काम केलं त्यामधील पीएफ नंबर आठवत नाही. दरम्यान जे लोक २०१४ च्या पूर्वीपासून नोकरी करत आहेत, त्यांना याबाबत मोठी समस्या होत होत असते. त्यावेळी UAN सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि प्रत्येक कंपनीने वेगवेगळे पीएफ नंबर दिले होते. त्यामुळे नोकरी बदलताना अनेक लोकांचे जुने पीएफ खाते मिळत नाही.
या समस्येचे निराकरण करण्यासाठी, EPFO ने एक सोपा मार्ग सांगितलाय. EPFO नुसार तुमच्याकडे PF नंबर नसला तरीही तुम्ही तुमचे PF खाते शोधू शकता. हे करण्यासाठी, कर्मचाऱ्याला युनिफाइड मेंबर पोर्टलला भेट द्यावी लागेल. नोंदणी केल्यानंतर किंवा त्यांच्या मोबाईल नंबरने लॉग इन केल्यानंतर, त्यांना काही आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल. एकदा त्यांचे आधार आणि पॅन तपशील प्रविष्ट केले की, सिस्टम स्वयंचलितपणे मागील रेकॉर्ड शोधते. पीएफ खाते १० वर्षे जुने असो किंवा १५ वर्षे जुने, त्याची माहिती मिळवता येते.
EPFO नुसार, जर तुमचा आधार तुमच्या UAN शी लिंक असेल आणि तुमचे KYC पूर्ण झाले असेल तर ही प्रक्रिया आणखी सोपी होत असते. तुमचे सर्व जुने आणि नवीन पीएफ अकाउंट एकाच यूएएन अंतर्गत जोडलेले आहेत. यामुळे तुमचे पीएफ पासबुक पाहणे सोपे होतेच, शिवाय पीएफ ट्रान्सफर आणि पैसे काढणे देखील सोपे होत असते.
याव्यतिरिक्त, EPFO 3.0 अंतर्गत आणखी एक प्रमुख सुविधा आणल्या जात आहेत. २०२६ पासून कर्मचारी त्यांचे पीएफचा पैसा एटीएम आणि UPI द्वारे काढू शकतील.याचा अर्थ असा की तुम्हाला आता तुमचा पीएफ काढण्यासाठी कार्यालयात जावे लागणार नाही. ही सुविधा अडचणीच्या वेळी फायदेशीर ठरणार आहे.
२०१४ पूर्वी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे जुने पीएफ खाते त्यांच्या यूएएनशी निश्चितपणे लिंक करावे. बऱ्याचदा, लोकांचे पैसे वर्षानुवर्षे त्यांच्या पीएफ खात्यात राहतात, कारण त्यांना त्यांच्या खात्याच्या तपशीलांची माहिती नसते. आता या नवीन सुविधेमुळे लाखो कर्मचाऱ्यांना त्यांचे जमा झालेले पैसे परत मिळण्यास मदत होईल. असं EPFOने सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.