

Farmer ID नसल्यास 6 सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही
राज्य आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या योजनांसाठी Farmer ID अनिवार्य
ओळख पडताळणी, थेट लाभ हस्तांतरणासाठी Farmer ID महत्त्वाची
शेतकऱ्यांसाठी राज्य आणि केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि आर्थिक सक्षम बनवणं असतं. शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळवा यासाठी फॉर्मर आयडी देण्यात येत आहेत. जर शेतकऱ्यांकडे फॉर्मर आयडी नसेल तर त्यांना सरकारच्या ६ योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे हे ओळखपत्र आवश्यक आहे.
आता तुम्ही म्हणाल हा फॉर्मर आयडी कसा मिळवायचा. तर घाबरू नका आम्ही तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती या लेखात देत आहोत. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा Farmer ID न काढल्यास भविष्यात अनेक महत्त्वाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळीच Farmer ID काढणे अत्यावश्यक आहे.
Farmer ID हा प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाणारा एक ओळख क्रमांक आहे. या कार्डशी आधार, सातबारा उतारा, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक जोडण्यात आलेले असतात. या ओळखीच्या आधारे शेतकऱ्याची जमीन, पीक, पीक पद्धत आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदवता जात असतो. यामुळे योजनांचा लाभ थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होते.
Farmer ID नसेल तर शेतकऱ्यांना महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळणार नाहीये. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. यासह पीक विमा योजना, महाडीबीटीवरील अनुदान योजना, कर्ज व व्याज सवलत योजना, आपत्ती नुकसान भरपाई, पीक खरेदी व हमीभाव योजनांचाही लाभ मिळणार नाही. कर्जमाफी किंवा व्याज अनुदान हवे असल्यास शेतकऱ्यांना या कार्डचा मोठा फायदा होईल. शिवाय बँकांना शेतकऱ्यांची माहिती पडताळणी करणे सोपे होणार आहे.
Farmer ID मुळे बनावट लाभार्थ्यांना रोखता येईल. योजनांमध्ये पारदर्शकता येईल. याशिवाय शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल, असा सरकारचा दावा आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण डेटा एकत्र उपलब्ध झाल्याने भविष्यात नवीन योजना आखणे सोपे होणार आहे.
Farmer ID ऑनलाइन किंवा स्थानिक कृषी कार्यालय, सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून काढता येते. आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक असतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.