

महागाईच्या जगात बचत करणं खूप कठीण झालयं. बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना सतत खरेदी, मोठ-मोठ्या हॉटेल्समध्ये जेवण, पार्टी, महागड्या वस्तूंची खरेदी याकडे लोक आकर्षित होत आहेत. त्यामुळे भविष्यात किंवा रिटायरमेंटनंतर बचत केली जात नाही. मग ऐनवेळी कुटुंबीयांचा गोंधळ उडतो. याच पार्श्वभुमीवर पोस्ट ऑफीस (Post Office) अनेक योजना राबवतं. त्यातून तुम्हाला रिटायरमेंटनंतर भरपूर फायदा होऊ शकतो. पुढील बाबतीत आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पोस्टाकडून जेष्ठ नागरिकांसाठी Senior Citizen Savings Scheme (SCSS) ही योजना सुरु करण्यात आली आहे. याची चर्चा सध्या सर्वत्र पसरत आहे. रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न मिळावं, बचत सुरक्षित राहावी आणि पैशाची चिंता नसावी, अशी इच्छा असणाऱ्यांसाठी ही योजना एक मजबूत पर्याय मानली जाते. सरकारी हमी असल्यामुळे अनेक जण या योजनेला पूर्णपणे सुरक्षित, म्हणजेच ‘रिस्क-फ्री’ गुंतवणूक म्हणून पाहतात.
SCSS योजनेत सध्या 8.2 टक्के इतके व्याज दिले जाते. हा दर अनेक बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यावर व्याजाची रक्कम तिमाही स्वरूपात थेट खात्यात जमा होते, त्यामुळे दरमहा नियमित उत्पन्न मिळण्यास मदत होते.
या योजनेत गुंतवणूक फक्त 1000 रुपयांपासून सुरू करता येते. तर कमाल गुंतवणूक मर्यादा 30 लाख रुपये (जॉइंट अकाउंटमध्ये) ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, SCSS मध्ये गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत वर्षाला 1.5 लाख रुपयांपर्यंत करसवलत मिळू शकते. त्यामुळे ही योजना बचतीसोबतच टॅक्स प्लॅनिंगसाठीही फायदेशीर ठरते.
या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असून, तो पुढे आणखी 3 वर्षांसाठी वाढवता येतो. मात्र, मुदतीआधी खातं बंद केलं तर काही प्रमाणात दंड लागू होतो. खाते उघडण्यासाठी वय किमान 60 वर्षे असणे आवश्यक आहे. मात्र VRS घेतलेले कर्मचारी आणि संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वयात काही सवलत दिली जाते.
जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 30 लाख रुपये SCSS मध्ये गुंतवले, तर 8.2 टक्के व्याजदरानुसार वर्षाला सुमारे 2 लाख 46 हजार रुपये व्याज मिळू शकतं. हे व्याज तिमाही स्वरूपात मिळाल्यास, दरमहा साधारणपणे 20,500 रुपयांपर्यंत उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे घरबसल्या नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो आणि रिटायरमेंटनंतरचा काळ आर्थिक तणावाशिवाय एन्जॉय करता येतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.