Sakshi Sunil Jadhav
भारतामध्ये सर्व करदात्यांसाठी Income Tax Department ने PAN आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केलं आहे. जर तुम्ही अजुनही हे लिंक केलं नसेल, तर तुमचा पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह होऊ शकतो.
PAN आणि आधार लिंक करणे हे तुमची ओळख पडताळण्यासाठी आणि डुप्लिकेट PAN टाळण्यासाठी आवश्यक आहे.
जर तुम्ही आधारला पॅन कार्ड लिंक केलं नाहीत. तर PAN कार्ड इनऑपरेटिव्ह होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या बँक व्यवहारांवर, कर्ज प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
जर पॅन कार्ड आधीच बंद झालं असेल, तर तुम्हाला दंड भरून तो पुन्हा सक्रिय करू शकता.
तुम्हाला लिंक करण्यासाठी PAN कार्ड, आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे.
Income Tax e-Filing Portal वर जाऊन तुम्ही ऑनलाइन लिंकिंग प्रक्रिया पूर्ण करू शकता.
आधी 1000 रुपये पर्यंतची पेनल्टी भरावी लागते, त्यानंतरच लिंकिंग रिक्वेस्ट सबमिट करता येईल.
OTP व्हेरिफिकेशननंतर तुमची PAN-आधार लिंकिंग रिक्वेस्ट UIDAI कडे पाठवली जाते.
लॉगिन न करता सुद्धा PAN आणि आधार लिंक करता येतं. फक्त PAN, आधार नंबर आणि OTP आवश्यक असतो.