Rule Change: इन्कम टॅक्स, HRA ते गिफ्ट; १ एप्रिलपासून ७ नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम

7 Rule Changes From 1st April: १ एप्रिलपासून करसंबंधित महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. त्यामुळे करदात्यांवर परिणाम होणार आहे.
Rule Change
Rule ChangeSaam Tv
Published On
Summary

१ एप्रिलपासून महत्त्वाचे नियम बदलणार

नवीन आयकर कायदा लागू होणार

एचआरए, भाडे भत्ता यामध्ये बदल

एप्रिल महिन्यापासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. नवीन आयकर नियमांमुळे करदात्यांवर परिणाम होणार आहे. दरम्यान, याबाबत अधिसूचना जारी केली आहे. आता सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT)ने कर्मचाऱ्यांच्या मिळणाऱ्या सर्व्हिसमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. १ एप्रिल २०२६पासून हे नियम लागू होणार आहे. यामध्ये एचआरएपासून ते अलाउंस अशा अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहे.

Rule Change
LPG News Rules: गॅस सिलिंडरच्या नियमात मोठे बदल, आता शहरात २५ दिवसांत LPG मिळणार, तर ग्रामीण भागात...

HRA मध्ये बदल (HRA)

जुन्या कर व्यवस्थेअंतर्गत मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, पुणे, अहमदाबाद, बंगळुरु अशा अनेक शहरांना उच्च एचआरए (HRA) सूटचा फायदा मिळणार आहे. या शहरांमध्ये राहणाऱ्या व्यक्ती पगारातील ५० टक्के रक्कमेपर्यंत एचएसआर क्लेम करु शकतात. इतर शहरांमध्ये ४० टक्के क्लेम करु शकतात.

मुलांचे शिक्षण आणि भत्ते

नवीन नियमांनुसार मुलांचा खर्च आणि त्यासंदर्भातील भत्त्यांमध्ये वाढ केली आहे. लहान मुलांच्या शिक्षण अलाउंसमध्ये १०० रुपयांवरुन ३००० रुपयांपर्यंत दर महिन्याला वाढ केली आहे.

कार वापरण्यावर टॅक्सचे नियम

आयकर नियम २०२६ नुसार, कर्मचारी जर आपल्या वैयक्तिक वापरासाठी किंवा ऑफिसच्या वापरासाठी कार वापरत असाल तर त्या नियमात बदल केली आहे.

कंपनीची कार किंवा भाड्यावर घेतलेल्या कारसाठी क्लेम

१.६ लीटर इंजिन क्षमता असलेल्या कर्मचाऱ्यांना ५००० रुपये आणि ३००० रुपये ड्रायव्हरसाठी मिळणार आहे. १.६ लीटरपेक्षा जास्त क्षमता असलेल्या इंजिनसाठी ७००० रुपये आणि ड्रायव्हरला ३००० रुपये दिले जातात.

घरगुती सुविधा आणि वापराबाबत नवीन नियम

घरगुती सुविधांमध्ये माळी, वॉचमन यांच्यासाठी दिलेल्या सेवांच्या पगारावर कर्मचाऱ्याकडून वसूल केलेली रक्कम वजा करुन कर आकारला जाईल. गॅस, वीज, पाणी बिल करपात्र असणार आहे.

भेटवस्तू आणि व्हाउचर

जर एखादी भेटवस्तू किंवा व्हाउचर १५००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर ते करपात्र असते.

Rule Change
Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

जेवण

कामाच्या वेळेत दिले जाणारे जेवण, इतर वस्तू, व्हाउचरद्वारे भरलेले पैसे करमुक्त असेल. ही रक्कम २०० पेक्षा जास्त नसावेत. नवीन कर प्रणालीअंतर्गत जेवणासाठी कूपन उपलब्ध आहेत.

कपातीसाठी आवश्यक पुरावा

नवीन आयकर नियमांनुसार,तुम्हाला कर कपातीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पुरावा सादर करावा लागेल. घरभाडे भत्ता, रजा, प्रवास, गृह मालमत्तेच्या व्याजाची कपात याची माहिती द्यावी लागणार आहे.

Rule Change
New Income Tax Act: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार; काय बदलणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com