Ind vs Eng : नाइट वॉचमन म्हणून आला अन् इंग्लंडला धुतलं; फिफ्टी ठोकताच आकाश दीपची मैदानावरील Reaction Viral

India vs England 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटीमध्ये आकाश दीपने खणखणीत अर्धशतक ठोकले आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी नाइट वॉचमन म्हणून आकाश दीप फलंदाजीसाठी आला होता.
Akash Deep Ind vs Eng 5th Test
Akash Deep Ind vs Eng 5th Testx
Published On
Summary
  • भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना ओव्हल, लंडन येथे सुरु आहे.

  • या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आकाश दीपने अर्धशतकीय खेळी केली आहे.

  • भारताच्या दोन विकेट्स पडल्यानंतर नाइट वॉचमन म्हणून आकाश दीप फलंदाजीला आला होता.

Akash Deep Ind vs Eng 5th Test : लंडनमधील ओव्हल येथे भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. आज (२ ऑगस्ट) या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या आकाश दीपने शानदार अर्धशतकीय कामगिरी केली आहे. नाइट वॉचमन म्हणून आलेल्या आकाश दीपने इंग्लंडच्या खतरनाक गोलंदाजांसमोर झुंजार खेळी करत चाहत्यांची मने जिंकली आहेत.

पाचव्या कसोटी सामन्यामध्ये पहिला डाव काल (१ ऑगस्ट) संपला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २२४ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा संघ २४७ धावांवर ऑलआउट झाला. दुसऱ्या डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जैस्वाल आणि केए राहुल ही जोडी मैदानात उतरली. जॉश टंगने केएल राहुलला लवकर माघारी पाठवले. गस एटकिन्सनने साई सुदर्शनला एलबीडब्लू आउट केले.

दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या काही तासांमध्ये भारताने दोन विकेट गमावल्या. तेव्हा खबरदारी म्हणून भारताने वेगवान गोलंदाज आकाश दीपला नाइट वॉचमन म्हणून फलंदाजीसाठी मैदानात पाठवण्यात आले. यशस्वी जैस्वालसह आकाश दीपने दुसऱ्या दिवशी शेवटपर्यंत संयमी फलंदाजी केली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये त्याने अर्धशतक ठोकले.

Akash Deep Ind vs Eng 5th Test
Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटीत तुफान राडा! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट भिडले, शांत केएल राहुलही भडकला; Video

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये इंग्लंडचा संघ सध्या आघाडीवर आहे. इंग्लंडने दोन कसोटी सामने जिंकले आहेत, एक सामना भारताने जिंकला आहे, तर एक कसोटी अनिर्णित राहिली आहे. त्यामुळे कसोटी मालिका बरोबरीत संपवण्याचा टीम इंडियाचा मानस आहे. दुसऱ्या बाजूला ओव्हल कसोटी जिंकून भारतावर मात करण्यासाठी इंग्लंडचा संघ लढा देत आहे.

Akash Deep Ind vs Eng 5th Test
रोहित शर्मा, विराट कोहली वनडेतून निवृत्त होणार? या दिवशी खेळणार अखेरचा सामना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com