Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Air Travel Update: विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला. सीट निवडण्यासाठी यापुढे प्रवाशांना जास्त पैसे द्यावे लागणार नाही. केंद्र सरकारने तिकीट नियमात बदल केलेत.
Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...
Flight New RuleGoogle
Published On

Summary -

  • विमान प्रवासासाठी नवीन नियम लागू

  • ६० टक्के सीट निवड मोफत करता येणार

  • कुटुंबांना एकत्र बसण्याची संधी

  • प्रवाशांना मोठा दिलासा आणि खर्चात बचत होणार

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता विमान प्रवास करताना तुमच्या आवडीचे सीट निवडण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार नाही. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता विमानातील ६० टक्के जागा पूर्णपणे मोफत असणार आहे. याचाच अर्थ की सीट निवडण्यासाठी कोणतेही अतिरिक्त पैसे आकारले जाणार नाही. महत्वाचे म्हणजे विमान प्रवासासाठी एकत्र तिकीट बुक करणारी कुटुंबे विमानात एकमेकांच्या शेजारी बसून प्रवास करू शकतील.

विमान तिकीट बुक करताना आपल्या आवडीचे सीट निवडण्यासाठी विमान कंपन्यांना अनेकदा जास्त पैसे द्यावे लागायचे. एकाच तिकिटावर (पीएनआर) बुकिंग करूनही कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळ्या जागांवर बसावे लागायचे. पण आता असे होणार नाही. कारण नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक नवीन आणि अधिक कठोर नियम लागू केले आहेत. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयामार्फत नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. या मार्गदर्शक तत्वाचा उद्देश विमान प्रवास अधिक पारदर्शक आणि सोयीस्वकर करणे हा आहे.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...
Electric Air Travel: टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त? 30 मिनिटांत गाठणार 130 किलोमीटर

मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता प्रवाशांना सीट बुकिंग करताना आपल्या आवडीचे सीट मिळणार आहे. यासाठी ज्यादा पैसे द्याव लागणार नाही. आता विमान कंपन्यांना कोणत्याही विमानातील किमान ६० टक्के जागा प्रवाशांना विनामूल्य देणे बंधनकारक असेल. म्हणजेच, विमानात सामान्य सीट निवडण्यासाठी यापुढे अनावश्यक खर्च करावा लागणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक प्रवाशाला सीट निवडण्याची समान संधी मिळेल आणि वेब चेक-इनमधील मनमानीपणाला आळा बसणार आहे.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...
Flight Ticket: सलग सुट्ट्यांमुळे विमान प्रवास महागला, तिकीटासाठी दुप्पट खर्च; गोवा- चेन्नईसाठी किती पैसे मोजावे लागणार?

प्रवाशांसाठी विमान प्रवासादरम्यान लहान मुले किंवा कुटुंबातील वृद्ध सदस्यांपासून दूर बसणे ही एक मोठी समस्या होती. प्रवाशांच्या या समस्येचे देखील केंद्र सरकारने निराकरण केले आहे. नव्या नियमानुसार, जर एकाच पीएनआरवर अनेक प्रवाशांचे बुकिंग केले असेल तर विमान कंपन्यांनी त्यांना एकत्र बसवणे बंधनकारक असणार आहे. अशा प्रवाशांना शेजारी-शेजारी जागा देण्यास प्राधान्य दिले जाईल. यामुळे प्रवाशांचे टेन्शन कमी होईल. तसेच ते आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत प्रवासाचा आनंद घेऊ शकतील.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...
Air India: फक्त १२०० रुपयांत विमान प्रवास, एअर इंडियाची भन्नाट ऑफर, वाचा नेमका प्लॅन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com