
सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी
टॅक्सीपेक्षा विमान प्रवास स्वस्त होणारेय... हो तुम्ही ऐकताय ते अगदी खरंय...कारण जगातल्या पहिल्या प्रवासी इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण झालंय. त्यामुळे हवाई प्रवासाचा चेहरामोहराच बदलणारेय. अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीज कंपनीनं हा इतिहास घडवलाय. हा इतिहास कसा रचला गेलाय? पाहूयात..(FIRST PASSENGER ELECTRIC AIRCRAFT)
इलेक्ट्रिक विमान Alia CX300चं पहिलं उड्डाण यशस्वी
30 मिनिटांत 130 किमीचा प्रवास
130 किमीच्या हवाई प्रवासाला केवळ 700 रुपये खर्च
इंधनावर उडणाऱ्या हेलिकॉप्टरसाठी 13 हजार 500 रुपये खर्च
इलेक्ट्रिक विमान पूर्ण चार्ज झाल्यानंतर नॉन स्टॉप 463 किमी पार करणार
त्यामुळे इलेक्ट्रिक विमानामुळे नेमका टॅक्सीपेक्षा विमान प्रवास कसा स्वस्त होईल...पाहूयात
१३० किलोमीटरच्या प्रवासाठी टॅक्सीला तीन ते चार हजार रुपये लागतात. मात्र इलेक्ट्रिक विमानानं या प्रवासाचा खर्च केवळ सातशे रुपये आहे.
तर हेलिकॉप्टरमधून एवढ्याच प्रवसाचा खर्च १३ हजार ५०० रूपये असून इलेक्ट्रिक विमानातून हाच खर्च केवळ सातशे रुपये होतो.
इलेक्ट्रिक विमानाच्या यशस्वी उड्डाणामुळए तंत्रज्ञानाच्या जगातली ही मोठी क्रांती समजली जातेय. यामुळे टॅक्सीऐवजी आता विमानानं प्रवास करणं अधिक परवडणार आणि तुलनेनं वेगावान होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.