Air India: फक्त १२०० रुपयांत विमान प्रवास, एअर इंडियाची भन्नाट ऑफर, वाचा नेमका प्लॅन

Air India Express Offer: विमान प्रवास करण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी खूपच जबरदस्त ऑफर आहे. फक्त १२०० रुपयांत तुम्हाला विमान प्रवास करता येणार आहे. तर ३७२४ रुपयांत आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे.
Air India : फक्त १२०० रुपयांत विमान प्रवास, एअर इंडियाची भन्नाट ऑफर, वाचा नेमका प्लॅन
Air indiarepresentative image
Published On

Summary -

  • एअर इंडिया एक्स्प्रेसने 'पे डे सेल'ची घोषणा केली.

  • देशांतर्गत प्रवासासाठी १२०० रुपये मोजावे लागणार आहे.

  • आंतरराष्ट्रीय तिकिटासाठी ३७२४ रुपये खर्च करावे लागतील.

  • मोबाईल अॅपवरून बुकिंगसाठी शून्य सुविधा शुल्क लागेल.

  • विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सैन्यदल सदस्यांसाठी विशेष सवलती आहेत.

एअर इंडिया एक्स्प्रेसने प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रवाशांसाठी जबरदस्त ऑफर आणली असून नुकताच पे डे सेलची (Pay Day Sale) घोषणा केली. या सेलच्या माध्यमातून तुम्हाला देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही मार्गांवर प्रवास करण्यासाठी तिकीटात मोठी सूट मिळणार आहे. देशांतर्गत प्रवासासाठी तिकीटाचे दर १२०० रुपयांपासून सुरू होते. तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी तिकीटाचे दर ३७२४ रुपयांपासून सुरू होते.

Air India : फक्त १२०० रुपयांत विमान प्रवास, एअर इंडियाची भन्नाट ऑफर, वाचा नेमका प्लॅन
Air India Plane Fire: दिल्ली एअरपोर्टवर मोठा अपघात; लँडिंगवेळी एअर इंडियाच्या विमानाला आग

एअर इंडिया एक्स्प्रेसची ही जबरदस्त ऑफर प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर ठरत आहे. ही तिकीट विक्री २७ सप्टेंबर रोजी सुरू झाली ज्याची सुविधा केवळ एअरलाइनच्या मोबाइल अॅप आणि अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. २८ सप्टेंबर म्हणजे आजपासून ही सुविधा इतर सर्व बुकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाली. १२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रवास करण्यासाठी प्रवासी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. विमान तिकीटाच्या बुकिंगची शेवटची तारीख १ ऑक्टोबर आहे.

या सेलदरम्यान विशेष सूट मिळविण्यासाठी प्रवाशांनी 'FLYAIX' हा प्रोमो कोड वापरणे गरजेचा आहे. ‘Xpress Lite’ कॅटेगरीतील देशांतर्गत प्रवासासाठी तिकिटांच्या किमती १,२०० रुपयांपासून सुरू होतात. यामध्ये चेक-इन बॅगेजला परवानगी नाही. दरम्यान, ‘Xpress Value’ श्रेणीमध्ये १,३०० रुपयांपासून सुरू होणारी तिकिटे उपलब्ध आहेत. ज्यामध्ये काही अतिरिक्त सुविधांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी तिकीट दर ३,७२४ रुपये (लाइट) आणि ४,६७४ रुपये (व्हॅल्यू) पासून सुरू होते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर प्रवाशांनी एअर इंडिया एक्सप्रेस मोबाईल अॅपद्वारे तिकिटे बुक केली तर त्यांना कोणत्याही प्रकारचे सुविधा शुल्क द्यावे लागणार नाही. म्हणजेच त्यांना शून्य सुविधा शुल्काचा लाभ मिळेल. चेक-इन बॅगेजवर विशेष सवलतींचा समावेश आहे. देशांतर्गत फ्लाइट्समध्ये १५ किलोपर्यंतच्या चेक-इन बॅगेजसाठी फक्त १,५०० रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समध्ये २० किलोपर्यंतच्या चेक-इन बॅगेजसाठी २,५०० रुपये शुल्क आकारले जाते. जे सामान्य दरांपेक्षा खूपच कमी आहेत.

Air India : फक्त १२०० रुपयांत विमान प्रवास, एअर इंडियाची भन्नाट ऑफर, वाचा नेमका प्लॅन
Plane Crash : अवकाशात थरार! लँडिंग गियर जाम झाले, विमान जमिनीवर कोसळले, VIDEO

तर बिझनेस क्लासमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना २० टक्क्यापर्यंत सूट, अधिक लेगरूम, मोफत 'गॉरमेअर' गरम जेवण आणि प्राधान्याने बोर्डिंग आणि सामान हाताळणीसारख्या सेवांचा आनंद घेता येईल. महत्त्वाचे म्हणजे एअर इंडिया एक्सप्रेसच्या ४० हून अधिक नवीन बोईंग ७३७-८ विमानांमध्ये आता या बिझनेस क्लास सुविधा उपलब्ध आहेत. ज्यामध्ये प्रीमियम अनुभव आणखी वाढेल. त्याचसोबत, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सशस्त्र दलातील सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष सवलती देखील मिळतील.

Air India : फक्त १२०० रुपयांत विमान प्रवास, एअर इंडियाची भन्नाट ऑफर, वाचा नेमका प्लॅन
plane emergency landing: भयंकर! ७१ प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाचं चाक हवेतच निखळलं, मुंबई एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग

एअरलाइनने प्रवाशांच्या सोयीसाठी EMI आणि 'Buy Now, Pay Later' पेमेंट पर्याय देखील सुरू केले आहेत. याव्यतिरिक्त मास्टरकार्ड डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे भरणाऱ्या प्रवाशांना देशांतर्गत बुकिंगवर २५० रुपये आणि आंतरराष्ट्रीय बुकिंगवर ६०० रुपयांची सूट मिळेल. एअर इंडिया एक्स्प्रेसने नुकताच दिल्ली आणि बंगळुरूवरून उदयपूर आणि जोधपूरसाठी थेट उड्डाणे सुरू केली आहेत.

Air India : फक्त १२०० रुपयांत विमान प्रवास, एअर इंडियाची भन्नाट ऑफर, वाचा नेमका प्लॅन
Plane Emergency Landing : महिला पायलटच्या धाडसाने विमानाचा मोठा अपघात टळला; धैर्याने ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com