plane emergency landing: भयंकर! ७१ प्रवाशांना घेऊन निघालेल्या विमानाचं चाक हवेतच निखळलं, मुंबई एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग

SpiceJet Flight Accident: ७१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्पाइसजेटच्या SG2906 या विमानाचे चाक हवेतच निखळले. त्यानंतर मुंबई विमानतळावर या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
SpiceJet Flight Accident
SpiceJet flight SG2906 makes emergency landing in Mumbai after wheel detaches mid-air – all 71 passengers safe.saam tv
Published On

संजय गडदे, साम प्रतिनिधी

गेल्या काही दिवसापांसून विमानाचे अपघाताच्या घटना वारंवार होत आहेत. आता स्पाईज जेट विमानाचं मुंबई विमानतळावर इमरजेंसी लँडिंग करण्यात आले. हाती आलेल्या माहितीनुसार, विमान क्रमांक SG2906चे चाक हवेतच निखळलं होतं. हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई विमानतळावर एका महिला पायलटचा अचानक फोन आला. त्यानंतर त्यांनी स्पाइसजेटच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली.

त्यानंतर काही काळासाठी काही उड्डाणे थांबवण्यात आले आहे. सध्या परिस्थिती ठीक असून विमानात 71 प्रवासी आणि दोन केबिन क्रू सर्व सुरक्षित आहेत. महिला पायलटने कॉल देऊन इमर्जन्सी लँडिंग संदर्भात माहिती दिली. त्यानंतर मुंबई विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले.

कांडला ते मुंबई या दिशेने उड्डाण घेत असलेल्या स्पाइसजेटच्या Q400 विमानाचे बाहेरील चाक उड्डाणानंतर धावपट्टीवर आढळले होते. तरीही विमानाने मुंबईकडे प्रवास सुरू ठेवला आणि विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. सुरळीत लँडिंगनंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवण्यात आले , अशी माहिती स्पाईस जेटच्या प्रवक्त्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com