
अमेरिकेचे F-35 लढाऊ विमानाचे लँडिंग गियर जाम झाल्याने विमान अलास्कामध्ये कोसळले.
पायलटने शेवटच्या क्षणी पॅराशूटच्या मदतीने जीव वाचवला, मात्र लढाऊ विमान कोसळून जळाले.
या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Accident : अमेरिकेमध्ये भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाचे एक F-35 लढाऊ विमान अलास्कामध्ये कोसळले. अपघातापूर्वी पायलटने विमान वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण ते प्रयत्न अयशस्वी ठरले. जेट विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टीममध्ये बर्फ तयार झाल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. बर्फ जमा झाल्याने लँडिग गियर जाम झाले आणि अपघात घडला.
विमानातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी पायलटने लॉकहीड मार्टिनच्या पाच अभियंत्यांसह हवेत ५० मिनिटे कॉन्फरन्स कॉल केला. जेव्हा हा प्रयत्न अयशस्वी झाला, तेव्हा पायलटला पॅराशूटच्या मदतीने विमानातून उडी मारावी लागली. त्यानंतर अलास्कातील धावपट्टीवर F-35 लढाऊ विमान क्रॅश झाले. विमानाचे लँडिंग गियर जाम झाल्याने ही दुर्घटना घडली.
उड्डाण सुरु झाल्यानंतर पायलटने गियर मागे घेण्याचा प्रयत्न केला. पण ते डाव्या बाजूला अडकले. गियर खाली करण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. जेट अनियंत्रित झाले. पायलटने हवेत असलेल्या अभियंत्यांशी संवाद साधत समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर, सेन्सरच्या चुकीच्या सिग्नलमुळे जेट विमान पूर्णपणे अनियंत्रित झाले आणि पायलटला जीव वाचवण्याचा पॅराशूटसह उडी मारावी लागली.
अपघातानंतर लढाऊ विमान धावपट्टीवर पडले आणि जळू लागले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात लढाऊ विमान आगीच्या गोळ्यात रुपांतरित होत असताना दिसते. विमानाच्या पुढच्या आणि उजव्या लँडिंग गियरच्या हायड्रॉलिक द्रवपदार्थात एक तृतीयांश पाणी होते, हे पाणी गोठल्याने गियर जाम झाले आणि भीषण दुर्घटना घडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.