
कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान AI2744 लँडिंगनंतर धावपट्टीवरून घसरले. सोमवारी सकाळी एअर इंडियाचे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. मात्र, लँडिंगदरम्यान, विमान धावपट्टीवरून घसरले. मुसळधार पावसामुळे अपघात घडल्याची शक्यता आहे. प्राथमिक माहितीनुसार, हवामान खराब असल्यामुळे लँडिंगदरम्यान, काही क्षणातच विमानावरील नियंत्रण सुटले आणि धावपट्टीवरून घसरले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान लँडिंगदरम्यान, तीन टायर फुटल्याची माहिती आहे. तसेच इंजिनलाही काही प्रमाणात नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, वैमानिकच्या सतर्कतेमुळे विमान सुरक्षितपणे टर्मिनल गेटपर्यंत पोहोचले. दरम्यान, सर्व प्रवासी सुखरूप असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेबाबत एअर इंडियानं अधिकृत निवेदन जारी केलंय, त्यात त्यांनी म्हटलं की, '२१ जुलै रोजी कोचीहून मुंबईच्या दिशेनं येणारं एआय २७४४ हे विमान लँडिंगनंतर धावपट्टीवरून घसरले. मुसळधार पावसामुळे हा अपघात घडला. मात्र, वैमानिकच्या सर्तकतेमुळे विमान सुरक्षितरित्या गेटपर्यंत पोहोचले. विमान लँड झाल्यानंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वाधिक म्हत्वाची आहे'.
या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनानं तातडीने पथक तैनात केले. याबाबत विमानतळ प्रशासनानेही निवेदन जारी केले आहे. '२१ जुलै रोजी सकाळी ०९ वाजून २७ मिनिटांनी कोचीहून एअर इंडियाचं विमान मुंबईत लँड झाले. या विमानाला लँडिंगदरम्यान, धावपट्टीवर अडथळा निर्माण झाला. यानंतर त्वरित आपात्कालिन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. धावपट्टी क्रमांक ०९/२७ चे किरकोळ नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. सध्या धावपट्टीची तपासणी आणि दुरूस्ती सुरू आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.