Social media KYC India: फेसबुक, इन्स्टा अकाऊंट बनवण्यासाठी आधार कार्ड लागणार? सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय

Aadhaar verification social media: देशात वाढत्या फेक अकाउंट्स आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सोशल मीडिया वापरासाठी केवायसी नियम लागू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या प्लॅटफॉर्मवर ओळख पडताळणी अनिवार्य होण्याची शक्यता आहे.
Social Media :
Social Media :Saam Tv
Published On

आजकाल सोशल मीडियावर फेक अकाउंट्स प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. येत्या काळात सोशल मीडिया वापरण्यासाठी आधारसारख्या ओळखपत्राची पडताळणी अनिवार्य होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त कऱण्यात येतेय.

संसदीय समितीने नुकत्याच दिलेल्या अहवालात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर केवायसी (KYC) सिस्टीम लागू करण्याची शिफारस करण्यात आलीये. या शिफारसीनुसार, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि एक्ससारख्या प्लॅटफॉर्म्सवर अकाउंट तयार करताना किंवा वापरताना युजर्सना त्यांची खरी ओळख दाखवावी लागू शकते. म्हणजेच बँक खाते किंवा सिम कार्डसाठी जशी केवायसी प्रोसेस आहे तशीच प्रोसेस सोशल मीडियासाठीही लागू होण्याची शक्यता आहे.

Social Media :
Liver tumor: लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यावर शरीर कसं सांगतं? ही महत्त्वाची 5 लक्षणं जाणून घ्या

काय आहे या प्रस्तावामागचा हेतू?

याचा मुख्य उद्देश म्हणजे फेक न्यूज, फसवणूक आणि वाढते सायबर क्राइम रोखणं हा आहे. सध्या अनेक जण खोटी ओळख वापरून लोकांना फसवतात, महिलांना आणि मुलांना त्रास देतात. त्यामुळे अशा बनावट अकाउंट्सवर नियंत्रण आणणं गरजेचं असल्याचं समितीचे मत आहे.

Social Media :
Diabetes Symptoms : पायाचे दुखणे दुर्लक्षित करू नका; असू शकतो मधुमेहाचा धोका, वाचा 5 लक्षणे

लहान मुलांना सोशल मीडियाच्या दुष्परिणामांपासून दूर ठेवण्यासाठी काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. आजच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्मवर मुलांचा वाढता सहभाग पाहता त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनलाय.

Social Media :
Live-in Relationship: विवाहित पुरूषही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात, पण...; हायकोर्टानं नेमकं काय सांगितलं? वाचा

जर हे केवायसी नियम लागू झाला तर प्रत्येक युजरची ओळख स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. यामुळे फेक अकाउंट्स तयार करणं कठीण होईल. अशावेळी गुन्हा करणाऱ्यांना शोधणं फार सोपं होणार आहे. परिणामी ऑनलाइन फसवणूक कमी होण्यास मदत होऊ शकते. सरकारचं मत असं आहे की, जेव्हा व्यक्तीची खरी ओळख अकाऊंटला जोडलेली असेल, तेव्हा चुकीचं कृत्य करण्याचं प्रमाण आपोआप कमी होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com