Liver tumor: लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यावर शरीर कसं सांगतं? ही महत्त्वाची 5 लक्षणं जाणून घ्या

Early symptoms of liver tumor: पोटाच्या उजव्या बाजूला वेदना, अचानक वजन कमी होणं, भूक न लागणं आणि त्वचा पिवळी होणं ही लिव्हरमध्ये गाठ असल्याची लक्षणं असू शकतात. वेळेत ओळख करून योग्य उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
Early symptoms of liver tumor
Early symptoms of liver tumorsaam tv
Published On

अचानक तुमच्याही पोटात वेदना होतात आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता का? अनेक वेळा साधा वाटणारा पोटदुखीचा त्रास मोठ्या आजाराचा इशारा देत असतो. लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यास शरीर काही संकेत देतं, पण हे संकेत लोक बहुतेक वेळा दुर्लक्षित करतात. त्यामुळे वेळेत लक्ष न दिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.

लिव्हर हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव मानला जातो. शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर काढणं, पचनक्रिया सुरळीत ठेवणं आणि आवश्यक पोषक तत्त्वं साठवणं यामध्ये लिव्हरची मोठी भूमिका असते. परंतु लिव्हरमध्ये गाठ तयार झाली तर त्याचा थेट परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. जयपूरमधील नारायणा हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अमित कुमार संघी यांनी याची माहिती दिली आहे.

पोटाच्या उजव्या बाजूला सतत वेदना जाणवणं

लिव्हर पोटाच्या वरच्या उजव्या भागात असतो. त्यामुळे लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यास या भागात सतत वेदना किंवा जडपणा जाणवतो. कधी ही वेदना सौम्य असते तर कधी ती तीव्र प्रमाणात त्रास होतो. काही वेळा ही वेदना खांद्यापर्यंत किंवा पाठीपर्यंतही पोहोचू शकते. डॉक्टरांच्या मते, हा त्रास दीर्घकाळ टिकत असेल तर तो दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं.

विनाकारण वजन कमी होणं

लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यावर शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते. त्यामुळे कोणतीही डाएट किंवा व्यायाम न करता देखील वजन हळूहळू कमी होऊ लागतं. व्यक्ती नियमित जेवण घेत असूनही शरीर अशक्त वाटू लागल्यास हे लक्षण गंभीर ठरू शकतं.

Early symptoms of liver tumor
Cancer Symptoms: तरूणांनो शरीरात ही लक्षणं दिसतायत तर व्हा सावध; शरीरात सायलेंट कॅन्सर करतोय घर

भूक न लागणं

लिव्हरमध्ये गाठ झाल्यास भूक कमी लागते. काही वेळा थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं. यासोबत उलटी होणं किंवा पोटात जडपणा जाणवणं अशी लक्षणंही दिसू शकतात. ही लक्षणं सातत्याने जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

त्वचा आणि डोळ्यांचा पिवळेपणा

लिव्हर नीट काम करत नसल्यास शरीरात बिलीरुबिनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे दिसू लागतात. ज्याला पिवळ्या काविळीची लक्षणं म्हणतात. यासोबत लघवीचा रंग गडद होणं असे बदलही दिसू शकतात.

Early symptoms of liver tumor
Foods That Harm Your Lungs: हे पदार्थ खाताय? सावध राहा, फुफ्फुसांवर होऊ शकतो गंभीर परिणाम

पोटात सूज किंवा गाठ जाणवणं

काही रुग्णांमध्ये पोटाच्या वरच्या भागात सूज किंवा कडक गाठ जाणवते. हे लिव्हरचा आकार वाढल्याचं संकेत असू शकतं. काही वेळा पोटात द्रव साचल्यामुळेही सूज दिसून येते ज्यामुळे श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.

Early symptoms of liver tumor
Fast lifestyle: तुम्हीही सतत घाईत असता? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञांच इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com