Cancer Symptoms: तरूणांनो शरीरात ही लक्षणं दिसतायत तर व्हा सावध; शरीरात सायलेंट कॅन्सर करतोय घर

What Are The Early Signs Of Colon Cancer: तरुणांमध्ये वाढत असलेल्या कोलन कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. अॅनिमिया, अचानक वजन घटणं, पोटदुखी आणि मलात रक्त दिसणं ही महत्त्वाची संकेत आहेत.
What Are The Early Signs Of Colon Cancer
What Are The Early Signs Of Colon Cancersaam tv
Published On

सध्याची जीवनशैली पाहता तरूणांमध्ये अनेक आजार वाढताना दिसतायत. यामध्ये कॅन्सरच्या रूग्णाचंही प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. अशातच तरुणांमध्ये कोलन कॅन्सर सातत्याने दिसून येतोय. दरम्यान हा कॅन्सर जीवघेणा असून तज्ज्ञांनी याबाबत इशारा दिलाय. जर याची लक्षणं वेळेत ओळखली गेली तर रूग्णाचा जीव वाचू शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.

डॉक्टरांच्या मते, कोलन कॅन्सरमध्ये सुरुवातीची लक्षणं अतिशय साधी आणि सामान्य असतात. त्यामुळे अनेकजण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. ब्रिस्टलमधील 'द लैगॉम क्लिनिक'चे डॉ. जॅक ओग्डेन यांनी सांगितलं की, या आजाराची काही महत्त्वाची लक्षणं अशी असतात ज्यात फारसा त्रास होत नाही. त्यामुळे लोक त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.

काय आहेत सुरुवातीचं संकेत?

सर्वात पहिलं लक्षण म्हणजे आयर्नची कमतरता, म्हणजेच अॅनिमिया. जर कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय थकवा जाणवणं, त्वचेचा रंग फिका होणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं अशा समस्या दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. अनेकदा कॅन्सरच्या ट्यूमरमुळे अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो.

What Are The Early Signs Of Colon Cancer
Dental infection effects: दातदुखी अंगावर काढाल तर हार्ट अटॅक येईल; नवीन अभ्यासाचा इशारा, तोंडातील इन्फेक्शन ठरेल जीवघेणं?

अचानक वजन घटणं

कोणताही प्रयत्न न करता वजन कमी होणं. जर तुम्ही डाएटिंग किंवा व्यायाम करत नसाल आणि तरीही वजन झपाट्याने कमी होत असेल तर याचा अर्थ शरीरात काहीतरी बिघाड असू शकतो. ट्यूमरमुळे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वं नीट मिळत नाहीत. त्यामुळे असं घडण्याची शक्यता असते.

पोटाशी संबंधित त्रास

जर तुम्हाला सतत पोटदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. अशावेळी वारंवार पोटदुखी होणं, पोटात मुरडा पडणं, अगदी थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखे वाटणं ही लक्षणं देखील कोलन कॅन्सरची असू शकतात.

What Are The Early Signs Of Colon Cancer
Weight loss injection: लठ्ठपणावर मात करणं आता झालं स्वस्त, वजन घटवणारं औषध ₹900 पासून उपलब्ध

शौचात रक्त दिसणं

केव्हाही तुम्हाला मलामध्ये रक्त दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं टाळा. जर स्टूलमध्ये काळसर किंवा गडद लाल रंग दिसत असेल तर ते शरीरात कुठेतरी अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याचे संकेत असतात.

What Are The Early Signs Of Colon Cancer
Urine color meaning: सकाळच्या लघवीचा रंग तुम्हाला काय सांगतो? हे संकेत सांगतात की तुमची किडनी खराब होतेय

डॉक्टरांनी सांगितलं की, ही लक्षणं तुम्हाला सतत दिसून येत असली तर त्याची त्वरित तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. स्टूल टेस्टसारख्या तपासण्यांमुळे आजाराची माहिती मिळण्यास मदत होते. एकदा हा कॅन्सर शरीराच्या इतर भागात पसरला तर रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com