Dental infection effects: दातदुखी अंगावर काढाल तर हार्ट अटॅक येईल; नवीन अभ्यासाचा इशारा, तोंडातील इन्फेक्शन ठरेल जीवघेणं?

Blood sugar and infection: दातांमध्ये होणाऱ्या इन्फेक्शनचा परिणाम फक्त तोंडापुरता मर्यादित राहत नाही, तर तो हळूहळू संपूर्ण शरीरावर परिणाम करू शकतो. संशोधनानुसार, दातांमधील बॅक्टेरिया रक्तात मिसळून इन्फ्लेमेशन वाढवतात आणि ब्लड शुगर तसेच हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते.
Blood sugar and infection
Blood sugar and infectionSAAAM T
Published On

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण दातांच्या दुखण्याला एक साधी समस्या समजतो. वेदना झाल्या की, डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घेतो. अशावेळी तो प्रॉब्लेम तिथेच संपला असं आपण समजतो. मात्र नुकत्याच एका संशोधनाने तुम्ही समजत असलेली ही गोष्टी किती धोकादायक आहे हे समजू शकतो. दातांच्या इन्फेक्शनचा परिणाम फक्त तोंडापुरता मर्यादित राहत नाही तर तो शरीराच्या इतर भागांवरही परिणाम करू शकतो, असं या अभ्यासातून स्पष्ट झालंय.

शरीरात हळूहळू पसरत जाणारा धोका

King’s College London च्या संशोधकांनी नुकताच एक क्लिनिकल अभ्यास केलाय. या अभ्यासात ‘एपिकल पेरियोडोंटायटिस’ नावाच्या सामान्य दातांच्या इन्फेक्शनवर अभ्यास केला गेला. हे इन्फेक्शन दाताच्या मुळाशी खोलवर तयार होतं आणि सुरुवातीला त्याची लक्षणं फारशी जाणवत नाहीत. ज्यावेळी वेदना तीव्र होतात तेव्हा ही समस्या रूग्णाच्या लक्षात येते.

Blood sugar and infection
Smart Snacking Tips: हेल्दी स्नॅक्स असूनही वजन वाढतंय, या छोट्या चुका बिघडवत आहेत तुमचं डाएट

संशोधनातून काय समोर आलं?

संशोधनात असं आढळलं की, हे इन्फेक्शन फक्त दातापुरता मर्यादित राहत नाही. हे इन्फेक्शन दातांमधील बॅक्टेरिया रक्तात मिसळू शकतात. त्यामुळे संपूर्ण शरीरात सूज निर्माण होण्याची शक्यता वाढते.

या संशोधनात ६५ रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये ज्यांनी रूट कॅनल करून घेतलं होतं. या सर्व रुग्णांचं तब्बल दोन वर्षे निरीक्षण करण्यात आलं. या काळात त्यांच्या दातांसोबतच रक्ताचीही तपासणी करण्यात आली.

Blood sugar and infection
Dog Bite First Aid: कुत्रा चावल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांत करा हे उपाय; डॉक्टरांनी दिला तातडीचा इशारा

उपचारानंतर काय बदल दिसतात?

ब्लड शुगरमध्ये घट- इन्फेक्शनवर उपचार झाल्यानंतर काही काळात रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचं पाहायला मिळालं.

कोलेस्ट्रॉलमध्ये सुधारणा- यावेळी काही काळासाठी रुग्णांच्या कोलेस्ट्रॉल आणि फॅटी अॅसिडच्या पातळीत सुधारणा झाल्याचं दिसून आलं.

संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, तोंडातील इन्फेक्शन आपल्या शरीरातील साखर आणि फॅट कसं नियंत्रित होतं यावरही परिणाम करू शकतं. हा परिणाम अचानक होत नाही, तर हळूहळू त्याचे बदल दिसून येतात.

या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका आणि वरिष्ठ क्लिनिकल लेक्चरर डॉ. सादिया नियाझी यांनी सांगितलं की, रूट कॅनल उपचार केवळ तोंडाच्या आरोग्यासाठीच फायदेशीर नसून तो डायबिटीज आणि हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासही मदत करू शकतात.

Blood sugar and infection
Smart Snacking Tips: हेल्दी स्नॅक्स असूनही वजन वाढतंय, या छोट्या चुका बिघडवत आहेत तुमचं डाएट

त्यांच्या मते, दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या दातांच्या इन्फेक्शनमुळे बॅक्टेरिया रक्तात प्रवेश करतात, ज्यामुळे शरीरात इन्फ्लामेशन वाढतं आणि ब्लड शुगर तसंच फॅटचे प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे अशा इन्फेक्शनचा वेळेत उपचार करणं अत्यंत गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com