

आजच्या आपलं आयुष्य इतकं बिझी झालंय की आरोग्याच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. असंच सकाळी उठल्यावर आपल्या शरीरात काही बदल होत असतात. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, लघवीचा रंग तुमच्या आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती देतात. सकाळच्या पहिल्या लघवीचा रंग शरीरात काय बिघाड आहे, किडनी कशी काम करतेय किंवा कुठलं इन्फेक्शन आहे याची माहिती देतात.
जयपूरमधील नारायणा रूग्णालयातील वरिष्ठ युरोलॉजिस्ट डॉ. उदय सिंग बेनिवाल यांनी सकाळच्या लघवीच्या रंगावरून आरोग्याचे संकेत कसे ओळखायचे, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
सकाळी लघवीचा रंग जर हलका पिवळा असेल तर तो सामान्य मानला जातो. मात्र जर रंग खूपच गडद पिवळा दिसत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता आहे. रात्री झोपेत पाणी न प्यायल्यामुळे हे घडू शकतं. पण दिवसभरही पाणी कमी प्यायलात तर दुसऱ्या दिवशी सकाळी रंग अधिक गडद दिसतो. यामुळे किडनीवर ताण येतो आणि किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.
जर सकाळच्या लघवीचा रंग अगदीच स्वच्छ किंवा पाण्यासारखा दिसत असेल, तर तो शरीरात जास्त पाणी असल्याचं लक्षण असू शकतं. जास्त पाणी पिणाऱ्यांमध्ये हे दिसून येतं. सामान्यतः ही गंभीर बाब नसते. पण जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडू शकतं.
सकाळच्या लघवीचा रंग गुलाबी किंवा हलका लाल दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हा रंग लघवीत रक्ताच्या अंशामुळे दिसू शकतो. किडनी स्टोन, युरिन इन्फेक्शन किंवा सूज यासारख्या समस्यांमुळे हा बदल दिसू शकतो. त्यामुळे अशा वेळी युरिन टेस्ट करणं गरजेचं असतं.
जर लघवीचा रंग चॉकलेटी दिसत असेल तर ही गंभीर बाब असू शकते. हा रंग शरीरात तीव्र डिहायड्रेशन असल्याचे संकेत देतो. तसंच लिव्हर किंवा किडनीशी संबंधित आजारांचंही हे लक्षण असू शकतं. काही औषधांमुळेही लघवीचा असा दिसू शकतो. पण हा रंग सतत दिसत राहिल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.