Foods That Harm Your Lungs
Foods That Harm Your LungsSAAM TV

Foods That Harm Your Lungs: हे पदार्थ खाताय? सावध राहा, फुफ्फुसांवर होऊ शकतो गंभीर परिणाम

Foods that damage lung health and breathing: प्रोसेस्ड मांस, साखरयुक्त पेय, फास्ट फूड आणि जास्त मीठ असलेले पदार्थ तुमच्या फुफ्फुसांसाठी हानिकारक ठरू शकतात. श्वसन सुधारण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत हे जाणून घ्या.
Published on

आपण काय खातो याचा आपल्या शरीरातील अवयवांवर परिणाम होत असतो. काही पदार्थांमुळे शरीरात इन्फ्लामेशन वाढतं. काही पदार्थ हे आपल्या फुफ्फुसांसाठी धोकादायक मानले जातात. तज्ज्ञांनी असे काही पदार्थ सांगितले आहेत जे तुमच्या फुफ्फुसांसाठी योग्य नाहीत. हे पदार्थ कोणते आहेत ते पाहूयात.

प्रोसेस्ड मांस

या मांसामध्ये नायट्रेट्स आणि काही हानिकारक घटक असतात. जे फुफ्फुसांसाठी धोकादायक असतात. अभ्यासांनुसार, याचं जास्त सेवन केल्यास विशेषतः वयस्कर आणि धूम्रपान करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसांची क्षमता कमी होऊ शकते.

Foods That Harm Your Lungs
Diabetes Control Tips : रक्तातली साखर कंट्रोल करण्यासाठी या गोष्टीचे सेवन करा, जाणून घ्या

स्विट ड्रिंक्स आणि मिठाई

जास्त साखर शरीरात इन्फ्लामेशन आणि रक्तातील साखर अचानक वाढवते. शिवायसॉफ्ट ड्रिंक्स पाणी पिण्याची गरज कमी करतात, ज्यामुळे कफ घट्ट होतो. हा कफ शरीराच्या बाहेर टाकणं कठीण होतं.

तळलेले आणि फास्ट फूड

या पदार्थांमध्ये असणारे अयोग्य फॅट्स शरीरात इन्फ्लामेशन वाढवतात. तसंच पोट फुगणं आणि ऍसिडिटीमुळे डायफ्रॅमवर दबाव येतो. अशावेळी श्वास घेणं अवघड होऊ शकतं. त्यामुळे त्रास होत असल्यास हे पदार्थ खाणं टाळावं.

Foods That Harm Your Lungs
Gas after drinking milk: दूध प्यायल्यानंतर पोटात गॅस किंवा दुखणं होतं? जाणून घ्या यामागचं खरं कारण

जास्त मीठ असलेले पदार्थ

जास्त प्रमाणात मीठाचं सेवन केल्यास शरीरात पाणी साचतं. अशावेळी सूज येते आणि श्वास घेणं जड वाटू शकतं. पॅकबंद पदार्थांमध्ये असलेलं मीठही जास्त असतं. या मीठामुळे तुमच्या फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो.

दुग्धजन्य पदार्थ

सर्वांनाच हा त्रास होतोच असं नाही. पण काहींना दूध, चीज किंवा दही खाल्ल्यानंतर कफाचा त्रास होतो. अशावेळी त्या व्यक्तीला श्वास घेणं कठीण होतं. त्यामुळे ज्यांना त्रास होतो त्यांनी असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.

Foods That Harm Your Lungs
Rice health benefits: रात्री भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं का? हा समज की गैरसमज?

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com