

नवीन आधार अॅप लाँच
आता आधारची सर्व कामे होणार ऑनलाइन
नवीन आधार अॅपची वैशिष्ट्ये काय?
आधार कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आधार कार्डसंबंधित सर्व कामे ऑनलाइन होणार आहेत. यूआयडीएआयने नवीन आधार अॅप लाँच केले आहे. अनेकदा ऑनलाइन कामे करुन देतो असं सांगून ऑनलाइन फ्रॉड करतात. परंतु आता यासाठीच सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता फेक वेबसाइट, स्पॅम कॉल आणि ओटीपीमुळे होणारे फ्रॉड लक्षात नवीन आधार अॅप लाँच केले आहे. जेणेकरुन फेक वेबसाइटला आळा बसेल.
नवीन आधार अॅपचे उद्दिष्ट युजर्संना अधिक चांगल्या पद्धतीने आधारसंबंधित कामे करणे हे आहे. ही प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी अॅप डिझाइन केले आहे.
नवीन आधार अॅपवरुन तुम्ही डिजिटल आधार कार्ड तयार करु शकतात. शेअर करण्यासाठी आणि पडताळणी (Verification)करण्यास मदत होणार आहे.
नवीन आधार अॅपचे फीचर्स (New Aadhaar App Features)
नवीन आधार अॅप दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त ठरणार आहे. हॉटेल चेक इनसाठी क्यू आर कोड आधारित आधार कार्ड द्यावे लागेल. याचसोबत चित्रपट तिकिटांवर वय पडताळणीसाठी ऑनलाइन आधार कार्ज देता येणार आहे. गरज पडल्यास फेस व्हेरिफिकेशनदेखील करता येणार आहे.
या अॅपमध्ये नवीन हायटेक फीचर्स आहेत. यात एका क्लिकवर बायोमेट्रिक लॉक, अनलॉक, ऑथेंटिकेशन हिस्ट्री शेअर करण्यासाठी क्यूआर आधारित कॉन्टॅक्स कार्ड असणार आहे.
एका मोबाईलवरुन पाच आधार प्रोफाइल मॅनेज करता येणार आहे. याचसोबत One Family-One App ला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
UIDAI चे चेअरमन नीलकंठ मिश्रा यांनी सांगितले की, पेपरलेस गोष्टी करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. यानंतरही असेच काही प्रयोग होती. या अॅपमधून तुम्ही फक्त काही ठरावीक माहितीच शेअर करु शकतात. ज्यामुळे तुमच्या माहितीचा दुरुपयोग होणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.