PIB Fact Check: SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! Aadhaar अपडेट करा अन्यथा खातं होणार बंद; वाचा व्हायरल मेसेजमागचं सत्य

PIB Fact Check of SBI YONO App: सध्या स्टेट बँकेच्या ग्राहकांना आधार अपडेट करण्यास सांगितले जात आहे. जर आधार अपडेट केले नाही तर तुमचं खातं बंद होईल, असं सांगितलं जात आहे. दरम्यान, या मेसेजमागचं सत्य काय ते जाणून घ्या.
PIB Fact Check
PIB Fact CheckSaam Tv
Published On

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता प्रत्येक ग्राहकाला आधार अपडेट करणे गरजेचे आहे. जर आधार अपडेट केले नाही तर तुमचे अकाउंट बंद होऊ शकते. सध्या सोशल मीडियावर स्टेट बँकेच्या नावाने एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जर तुम्ही आधार अपडेट केले नाही तर SBI YONO App ब्लॉक होईल, असं सांगितलं जात आहे. याबाबत स्टेट बँकेने स्वतः माहिती दिली आहे.

PIB Fact Check
Aadhaar Card: आधारकार्ड अपडेट करणं झालं आणखी सोपं; घरबसल्या कागदपत्राशिवाय करा झटपट काम

व्हायरल मेसेज काय?

स्टेट बँकेच्या या मेसेजमध्ये लिहलंय की, आधार अपडेट केले नाही तर योनो अॅप ब्लॉक होईल. याचसोबत एक APK फाइल डाउनलोड करायला सांगतात. ज्यामध्ये आधार अपडेटची संपूर्ण प्रोसेस सांगितली जाते. दरम्यान, अनेक ग्राहक या लिंकवर क्लिक करतात परंतु यामुळे त्यांचे नुकसान होऊ शकते.

PIB Fact Check ने याबाबत सांगितले की, हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया APK फाइल डाउनलोड करण्यास सांगत नाही. याचसोबत युजर्सची कोणतीही माहिती मागत नाही. त्यामुळे हा मेसेज फ्रॉड आहे. याद्वारे तुमची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे तुमचे अकाउंट रिकामी होऊ शकते.

PIB ने दिला सतर्कतेचा इशारा (PIB Fact Check)

PIB ने एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे सांगितले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया कोणत्याही प्रकारची फाइल डाउनलोड करण्यास सांगत नाही. याचसोबत ओटीपी किंवा पिन नंबर मागत नाही.

ही काळजी घ्या

स्टेट बँकेने स्पष्ट केले की, आधार अपडेटची कोणतीही प्रक्रिया ही ब्रँच,YONO App किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे पूर्ण होते. यासाठी स्टेट बँक तुम्हाला कोणताही व्हॉट्सअॅप मेसेज किंवा एसएमएस पाठवत नाही. याचसोबत कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही.

PIB Fact Check
सरकार गरिबांना देणार 46 हजार रुपये? अर्थमंत्रालय गरिबांना आर्थिक मदत देणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com