

सध्याच्या जीवनात फोन हा सगळ्यात महत्वाचा आणि आवडीचा भाग झाला आहे. फोनमध्ये प्रत्येकाच्या पर्सनल गोष्टींपासून ऑफीसचे सगळे ई-मेल पासवर्ड्स असतात. बॅंकेचे डॉक्यूमेंट डिटेल्स असतात. त्यामुळे मोबाईलला पासवर्ड ठेवला जातो. मात्र काही लोकांना अनोळखी व्यक्तीचा आलेला फोन महागात पडू शकतो.
पैशांची लूट, वैयक्तिक माहिती चोरणं किंवा बँक खात्यावर डल्ला मारणं, असे अनेक प्रकार फोन कॉलच्या माध्यमातून तयार करतात. अनेकदा हे कॉल अगदी विश्वासू वाटतात, मात्र त्यामागे मोठा धोका लपलेला असतो.
कधी तुम्हाला परदेशी लॉटरीचं तिकीट खरेदी करण्याचा फोन येतो, तर कधी अचानक “तुम्ही बक्षीस जिंकलं आहे” असं सांगितलं जातं. मात्र अशा कॉलवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरतं. परदेशी लॉटरीमध्ये सहभागी होणं अनेक देशांत बेकायदेशीर आहे आणि अशा कॉलमधून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जातो.
अनेकांना “तुम्ही टॅक्स भरलेला नाही” किंवा “तुमच्यावर कारवाई होणार आहे” अशी धमकी देणारे कॉल येतात. सरकारी यंत्रणा कधीही फोनवरून तात्काळ पैसे भरण्याची मागणी करत नाहीत. कराबाबत कोणतीही माहिती अधिकृत पत्राद्वारेच दिली जाते. याचप्रमाणे बँक किंवा क्रेडिट कार्ड फसवणुकीचा बनाव करून लोकांना पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करायला सांगतात.
काही वेळा फक्त एकदाच रिंग होऊन कॉल कट होतो आणि उत्सुकतेपोटी लोक परत कॉल करतात. मात्र हे कॉल महागड्या चार्जेस असलेल्या क्रमांकांवर वळवले जातात आणि त्यातून आर्थिक नुकसान होतं. स्क्रीन शेअर करायला सांगून तुमचा डेटा किंवा बँक माहिती चोरण्यात येते. कोणतीही खरी कंपनी अशा पद्धतीने अनाहूत फोन करत नाही.
तज्ज्ञांच्या मते, कोणताही अनोळखी फोन आला तर शांत राहणं, लगेच निर्णय न घेणं आणि वैयक्तिक माहिती शेअर न करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. संशयास्पद कॉल आल्यास तो तात्काळ कट करून संबंधित अधिकृत संस्थेच्या हेल्पलाईनवर माहिती घेणं हाच सुरक्षित मार्ग आहे. थोडी सावधगिरीच तुम्हाला मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.