Sakshi Sunil Jadhav
हिवाळ्यात ख्रिसमसची सुट्टी सगळ्यांनाच मिळते. या दिवसांमध्ये गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी फिरण्याचा विचार करत असाल तर हिंगोळीजवळील सुंदर आणि प्रसिद्ध ठिकाणांना एकदा नक्की भेट द्या.
हिंगोलीपासून जवळ असलेलं औंढा नागनाथ हे धार्मिक स्थळ असलं, तरी हिवाळ्यात तिथंली शांतता आणि थंड हवामान मनाला प्रसन्न करेल.
हिवाळ्यात इसापूर धरणाचा परिसर निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग ठरतो. सकाळी पडलेलं धुकं, थंड वारा आणि पाण्यावर पडलेलं गुलाबी ऊन पाहण्यासारखं असतं.
हिंगोलीजवळ ग्रामीण भागात हिवाळ्यात शेतरानात फिरण्याचा अनुभव वेगळाच असतो. हिरवळ आणि थंड हवा मनाला शांत करतं.
हिवाळ्यात पूर्णा नदीकाठावर निवांत वेळ घालवता येतो. गर्दी नसल्यामुळे कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत शांत सहल शक्य होते.
हिंगोली जिल्ह्यातले काही वनपरिसर हिवाळ्यात सगळ्यात सुंदर दिसतात. सकाळच्या वेळेस पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंड वातावरण खास अनुभव देतं.
हिवाळ्यातली गुलाबी थंडीत सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याची मज्जा काही औरच असते. हिंगोलीजवळील टेकड्या यासाठी उत्तम आहेत.
कमी गर्दी, धुके आणि नैसर्गिक प्रकाशामुळे हिवाळा हा फोटोग्राफीसाठी सर्वोत्तम काळ असतो. निसर्गप्रेमींना ही ठिकाणं नक्की आवडतील.
हिंगोली परिसरातील ही ठिकाणं फारशी प्रसिद्ध नसल्यामुळे राहणं, प्रवास आणि खाणं तुलनेने स्वस्त पडतं. कमी खर्चात सुंदर ट्रिप शक्य होते.