Aadhaar Address Update: आधार कार्डावरचा पत्ता कसा बदलायचा? किती शुल्क लागणार? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Aadhaar Update: UIDAI च्या नवीन मोबाइल अ‍ॅपमुळे आता आधार कार्डवरील पत्ता घरबसल्या बदलता येणार आहे. 75 रुपये शुल्क भरून OTP आणि कागदपत्रांच्या मदतीने नागरिक सहज अपडेट करू शकतात.
Aadhaar address update online
how to update Aadhaar address at home GOOGLE
Published On

आधार कार्ड हा आपला स्थायिक पुरावा आहे. एखाद्या ठिकाणी फिरायला जाताना आपण ओळखपत्र म्हणून आधार कार्ड घेऊन जातो. यामध्ये आपला राहत्या घराचा पत्ता, जन्म तारिख, आधार क्रमांक, पूर्ण नाव अशी महत्वाची माहिती असते. त्यामुळे त्याचा वापर केला जातो. सिम कार्ड घेण्यापासून ते विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापर्यंत तुम्हीही आधार कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची ठरेल.

बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की आधार कार्डावर चुकीचा पत्ता येतो. कधीकधी तुम्ही एका ठिकाणाहून शहरातून दुसऱ्या शहरात राहायला जाता. त्यामुळे तुम्हाला आधार कार्डावरचा पत्ता बदलावा लागतो. त्यासाठी तुम्हाला पोस्टात जाऊन लांबच्या लांब रांगांमध्ये उभं राहावं लागतं. आता टेन्शन सोडा, तुम्हाला आता हे बदल घरबसल्या करता येणार आहेत. त्यासाठी तुमच्याकडे स्मार्ट फोनची आवश्यकता आहे.

Aadhaar address update online
Samsung Galaxy S26 सीरिज लाँच, जगातील पहिला 2nm चिपसेट मोबाइल, किती आहे किंमत?

UIDAI ने नवीन आधार अ‍ॅप सादर केले आहे. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही ते प्ले स्टोअरवरुन सहज डाउनलोड करू शकतात. याने डिजिटल आधार आणि QR कोडची सुविधा थेट मोबाईलमध्ये उपलब्ध होईल. तसेच पत्ता बदलण्यासाठी आधार केंद्रात सारख्या चकरा माराव्या लागणार नाहीत. घरबसल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो करून पत्ता अपडेट करता येणार आहे.

अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर आधार क्रमांक आणि OTPच्या मदतीने लॉगिन करा. लॉगिन केल्यानंतर ‘Service’ या पर्यायामध्ये पत्ता बदलण्याचा पर्याय दिलेला आहे. नागरिकांना पत्ता अपडेट करताना दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिल्या पर्यायात आवश्यक कागदपत्र अपलोड करून पत्ता बदलता येतो, तर दुसऱ्या पर्यायात कुटुंबातील सदस्याच्या आधारच्या मदतीने पत्ता अपडेट करता येतो.

पत्ता बदलण्यासाठी 75 रुपये शुल्क आकारले जाईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आधारवरील माहिती वेळोवेळी अपडेट ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून शासकीय सेवा, बँकिंग प्रक्रिया किंवा KYC संबंधित कामांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

Aadhaar address update online
High Blood Pressure: BP सकाळच्या वेळेस अचानक वाढतोय? लगेचच घ्या हे 7 ड्रिंक्स, मिळेल त्वरित आराम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com