

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयीत मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. लोक दिवसभर लोक कामाच्या गडबडीत स्वत: च्या तब्बेतीकडे पाहत नाहीत. बऱ्याचदा शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. जसं की, तहान लागल्यावर उचकी लागते. ही बेसिक गोष्ट आपल्याला माहित असते. तसेच काही गंभीर आजारांबद्दलही शरीर संकेत देतं. पण आपल्याला ती लक्षणे वेळीच ओळखता येत नाहीत. त्यामुळे आपण झालेल्या आजारावर उशीरा उपचार करतो.
पुर्वी लोकांना म्हातारपणी होणारा आजार हा वयाच्या तिशीतच व्हायला लागलाय. तो आजार म्हणजे तुमचा उच्च रक्तदाबाचा त्रास. त्यावर उपचार तर केले जातात. त्यासोबत तुमच्या आहारात काही बदल सुद्धा महत्वाचे असतात. तुम्ही अशावेळेस आहार तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार काही पेय घेऊ शकता. याने तुमचा BP कंट्रोलमध्ये राहतो. तसेच गोळ्या औषधांसोबत त्याचा परिणाम उत्तम प्रकारे शरीरावर दिसतो.
हाय ब्लड प्रेशर नॅचरली कमी करण्यासाठी पुढील 7 ड्रिंक्स तुम्ही सकाळी उठल्यावर चहाच्या आधी घेऊ शकता.
१) कोमट लिंबूपाणी
सकाळी रिकाम्या पोटी कोमट लिंबूपाणी घ्या. त्याने रक्ताभिसरण सुधारतं. त्यातले अँटीऑक्सिडंट्स रक्तवाहिन्या लवचिक ठेवण्यास मदत करतात.
२) बीटाचा रस
बीटामध्ये नायट्रेट्स असतात, जे नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित होतात. त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या रुंद होऊन रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
३) नारळपाणी
नारळपाण्यात पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असते. हे शरीरातील सोडियम संतुलित ठेवून हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवतात.
४) जास्वंदाचा (हिबिस्कस) चहा
हिबिस्कस चहामध्ये अँटीहायपरटेन्सिव्ह गुणधर्म असतात. त्याने सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरतो.
५) आवळ्याचा रस
आवळा व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. तो रक्तवाहिन्या मजबूत करतो आणि हृदय आरोग्यास मदत करतो.
६) लसूणाचे पाणी
लसणातील अॅलिसिन घटक रक्तवाहिन्या रुंद करण्यास मदत करतो. सकाळी कोमट लसूण पाणी घेतल्याने रक्तदाब कमी होऊ शकतो.
७) ओव्याचे (अजवाइन) पाणी
ओव्यामध्ये रक्तवाहिन्यांच्या भिंती शिथिल करणारे घटक असतात. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि हायपरटेन्शन नियंत्रणात राहते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.