Samsung Galaxy S26 सीरिज लाँच, जगातील पहिला 2nm चिपसेट मोबाइल, किती आहे किंमत?

Samsung S26 Ultra Price In India: सॅमसंगच्या गॅलेक्सी S26 सिरीजमध्ये 2nm चिपसेट, एजेंटिक एआय, प्रायव्हसी डिस्प्ले, सुपरफास्ट चार्जिंग आणि प्रगत नाइटोग्राफी कॅमेरा देण्यात आला असून सुरक्षित व स्मार्ट अनुभव प्रदान केला जातो.
samsung s26 ultra price in india
samsung s26 ultra price in india 91mobilesgoogle
Published On

प्रत्येकाच्या आयुष्यात आता मोबाईल महत्वाचा आणि अविभाज्य घटक झाला आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपण त्याच्या सोबत असतो. मोबाईलही दिवस भर तुम्हाला साथ देतो. त्याचा वापर करुन अनेकांना कोट्यावधी रुपये सुद्धा मिळवता आले आहेत. त्यामुळे मोबाईलची क्रेज आत्ता सर्वसामान्यांपासून उच्च वर्गीयांपर्यंत वाढत चालली आहे. त्यातच एका नवीन धांसू मोबाईलची बाजात एंट्री झाली आहे.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आज आपल्या बहुप्रतिक्षित ‘गॅलेक्‍सी एस२६’ सिरीजचे अनावरण केले. या सिरीजमध्ये गॅलेक्‍सी एस२६, एस२६+ आणि एस२६ अल्ट्रा या मॉडेल्सचा समावेश असून तिसऱ्या पिढीतील एआय स्मार्टफोन म्हणून ती सादर करण्यात आली आहे. कंपनीच्या मते, ही सिरीज पार्श्वभूमीत जटिल कामे हाताळते आणि वापरकर्त्यांना केवळ परिणामांवर लक्ष केंद्रित करता येईल असा अनुभव देते.

कंपनीचे सीईओ आणि डिव्हाइस एक्सपीरियन्स विभागाचे प्रमुख टीएम रोह यांनी सांगितले की, या सिरीजमध्ये एआय अधिक सहज, नैसर्गिक आणि वापरकर्त्यांच्या दैनंदिन जीवनात शांतपणे कार्य करणारी बनवण्यात आली आहे.

गॅलेक्‍सी एस२६ अल्ट्रा हा केवळ ७.९ मिमी जाडीचा सर्वात स्लिम अल्ट्रा डिव्हाइस असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये मोबाईलसाठी प्रथमच अंगभूत प्रायव्हसी डिस्प्ले देण्यात आला असून सार्वजनिक ठिकाणी वापरताना स्क्रीनवरील माहिती इतरांना दिसणार नाही, अशी रचना आहे.

या सिरीजमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलाईट जेन ५ मोबाईल प्लॅटफॉर्म फॉर गॅलेक्सी प्रोसेसर देण्यात आला आहे, जो अधिक वेगवान आणि कार्यक्षम कामगिरी देतो. सुपरफास्ट चार्जिंग ३.० तंत्रज्ञानामुळे अवघ्या ३० मिनिटांत ७५ टक्क्यांपर्यंत चार्जिंग शक्य असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

samsung s26 ultra price in india
SBI Recruitment 2026: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये भरतीची शेवटची तारीख समोर, अजिबात चुकवू नका ५०,००० पगाराची नोकरी, अर्ज कसा करायचा? वाचा...

कॅमेरा विभागातही मोठे अपग्रेड करण्यात आले आहे. अधिक रुंद अपर्चरमुळे कमी प्रकाशात उत्कृष्ट फोटो काढता येतात. सुधारित नाइटोग्राफी व्हिडिओ आणि सुपर स्टेडी तंत्रज्ञानामुळे स्थिर आणि स्पष्ट व्हिडिओ शूटिंग शक्य होते. एआय आयएसपी सुधारणा सेल्फी कॅमेऱ्यातही दिसून येतात. अॅडवान्स्ड प्रोफेशनल व्हिडिओ (एपीव्ही) स्टँडर्डला सपोर्ट करणारा हा पहिला गॅलेक्‍सी स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

एस२६ सिरीज एजेंटिक एआयच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. ‘नाऊ नज’ फीचर वेळेवर सूचना देऊन कार्यप्रवाह सुरळीत ठेवते. अपग्रेडेड बिक्‍स्‍बी नैसर्गिक भाषेतून सेटिंग्ज बदलणे आणि नेव्हिगेशन करणे अधिक सोपे करते. तसेच जेमिनी आणि परप्‍लेक्सिटीसारख्या एआय एजंट्ससोबत अधिक सखोल एकत्रीकरण देण्यात आले आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने प्रायव्हेट अल्बम, नॉक्स मॅट्रिक्स संरक्षण, सात पिढ्यांचे ओएस अपग्रेड्स आणि सात वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्यात येणार आहेत. सर्व मॉडेल्समध्ये एकसमान डिझाइन भाषा ठेवण्यात आली असून कोबाल्ट व्हायोलेट, व्हाइट, ब्लॅक आणि स्काय ब्ल्यू हे रंग पर्याय उपलब्ध असतील.

यासोबतच कंपनीने गॅलेक्‍सी बड्स४ सिरीजही सादर केली आहे. गॅलेक्‍सी बड्स४ प्रो आणि गॅलेक्‍सी बड्स४ या मॉडेल्समध्ये हाय-फाय ऑडिओ, अधिक रुंद वूफर, सुधारित अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन आणि २० हर्ट्झ ते ४० किलोहर्ट्झपर्यंत फ्रिक्वेन्सी रेंज देण्यात आली आहे. हे मॉडेल्स व्हाइट आणि ब्लॅकमॅट फिनिशमध्ये उपलब्ध असतील. सॅमसंगच्या या नव्या फ्लॅगशिप सिरीजमुळे एआय-आधारित स्मार्टफोन अनुभव अधिक प्रगत आणि सुरक्षित होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस२६ अल्ट्रा ५जी भारतात तीन प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. गॅलेक्सी एस२६ अल्ट्राच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १,३९,९९९ रुपयांपासून सुरू होते. ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,५९,९९९ रुपये आहे. या सॅमसंग फोनच्या १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,८९,९९९ रुपये आहे.

samsung s26 ultra price in india
Sparrow Behavior: चिमणी कोणतं अन्न खाते? ही माहिती वाचून बसेल धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com