

प्रत्येकालाच बॅंकींग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असते. अनेकांना ही या क्षेत्रात काम करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. नोकरी शोधण्यासाठी विविध ठिकाणी चौकशी करावी लागते. त्यांच्याचसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसुचना जाहीर केल्या आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यात निवडलेल्या उमेदवारांना वार्षिक ५० लाख रुपयांचे वेतन मिळणार आहे.
स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या भरती प्रक्रियेच्या मदतीने विविध पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये असिस्टंट व्हाईस प्रसिडेंट १२ पदे रिक्त आहेत, त्या जागी तुमची नियुक्ती केली जाऊ शकते. सोबतच डेप्युटी मॅनेजर पदासाठी ४३ पदे आणि डेप्युटी मॅनेजरची एकूण ६१ पदे असणार आहेत. या पदासांठी अर्ज प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी १५ मार्च २०२६ पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. या तारखेनंतर अर्जांच्या मागण्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
बँकेतील विविध तांत्रिक आणि फायनान्स पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तांत्रिक पदांसाठी संबंधित विषयात बीई किंवा बीटेक तसेच संगणक विज्ञानातील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. फायनान्स पदांसाठी सीए, आयसीडब्ल्यूए किंवा एमबीए पात्रता यामध्ये आवश्यक आहे. उमेदवारांचे वय २३ ते ४२ वर्षांपर्यंत असावे.
हा सुद्धा नियम महत्वाचा असणार आहे. अर्ज छाननीनंतर मुलाखतीद्वारे अंतिम निवड केली जाणार आहे. शेवटी पात्र उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागेल. तसेचस वैयक्तिक मुलाखत सुद्धा घेतली जाणार आहे. त्याच्या आधारे तुम्हाला नोकरीची संधी मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.