Air Free Tyres: ना पंक्चर, ना हवा भरण्याची गरज! बाजारात आले Air Free टायर, वैशिष्ट्ये काय?

Best New Tyre: ब्रिजस्टोनने तिसऱ्या पिढीतील एअरफ्री टायर तंत्रज्ञान सादर केले आहे. हे टायर पंक्चरप्रूफ असून हवा भरण्याची गरज नाही. एआय-आधारित रचनेमुळे सुरक्षित, टिकाऊ आणि आरामदायी प्रवास शक्य होणार आहे.
Best New Tyre
Air Free Tyresgoogle
Published On

सध्या लाईफस्टाईलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. लोकांना पायी चालत जाणं कंटाळवाणं वाटतंय. पण फिटनेससाठी लोक लाखो रुपये खर्च करुच शकतात. बऱ्याचदा कामाला, ऑफीसला जाताना अनेकांना गाड्या हव्या असतात. म्हणजे रोजच्या धकाधकीच्या ट्रेनच्या गर्दीपासून सुटका हवी असते. त्यामुळे लोक स्वत:च्या गाड्या विकत घेतात. घरात एखादी गाडी असली की, कोणत्याही ठिकाणी सहज जाता येतं. पण गाडीची सतत कामं निघाली की डोकं फिरतं.

बऱ्याचदा महत्वाच्या ठिकाणी प्रवास करताना, कधीकधी कामाला जाताना गाडीचा टायर पंक्चर होतो आणि वेळेचं सगळं गणित बिघडतं. जिथे जायचंय तिथे पोहोचता येत नाही, गाडी जागची हालत नाही आणि खिशातला पैसाही कमी होतो. मात्र आता एक खुशखबर आहे. वाहन चालकांच्या समस्येचा विचार करुन एक विकसित तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे. याने तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीचीही बचत होऊ शकते.

Best New Tyre
Kidney Failure Symptoms: किडनी निकामी होण्याआधी हे ३ गंभीर आजार देतात अलर्ट; तज्ज्ञांनी सांगितली नेमकी कारणं, वेळीच व्हा सावध

तुम्ही यासाठी एअरफ्री टायरटचा वापर करु शकता. जागतिक स्तरावर नावाजलेल्या कंपनीने Bridgestone सध्या आपल्या तिसऱ्या पिढीतील एअरफ्री टायर तंत्रज्ञानाची चाचणी केली. नेहमीसारखे हवेवर अवलंबून असणारे हे टायर्स नाहीत. हे मजबूत आणि लवचिक साहित्याच्या वापराने तयार केले जाणारे टायर आहेत. त्यामध्ये डेव्हलअप सिम्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कंपनीच्या मते, हे टायर विविध हवामान आणि रस्त्याच्या परिस्थितीत जास्त कार्यक्षम ठरतात तसेच दीर्घकाळ टिकातात.

या एअरफ्री टायरचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची एआयवर आधारित डायनामिक स्ट्रक्चर. या टायरचा आकार आणि दाब वेगवेगळ्या परिस्थितीनुसार ऑटोमॅटीकपणे केला जातो. त्यामुळे वाहनाच्या प्रकारानुसार टायर जास्त प्रभावीपणे काम करतो आणि प्रवासाचा आरामही सुधारतो. दुसऱ्या पिढीच्या तुलनेत या नव्या मॉडेलमध्ये राइड कम्फर्ट आणि स्थिरतेवर जास्त भर देण्यात आला आहे.

जागतिक टायर उत्पादक Bridgestone ने एअर-फ्री टायर्समध्ये निळ्या स्पोक्सची रचना वापरली असून हे स्पोक्स पुनर्नवीनीकरण थर्मोप्लास्टिक रेझिनपासून तयार आहेत. ते वाहनाचे वजन समर्थपणे पेलतात व धक्के कमी करतात. मार्च 2024 पासून जपानमधील टोकियोच्या कोडायरा शहरात ग्रीन स्लो मोबिलिटीसाठी चाचणी सुरू असून सध्या व्यावसायिक ट्रक आणि अल्ट्रा-कॉम्पॅक्ट ईव्हीवर परीक्षण सुरू आहे.

सामान्य प्रवासी कार वापरकर्त्यांना या अत्याधुनिक एअरफ्री टायरसाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते. सुरक्षितता, टिकाऊपणा आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे टायर भविष्यातील मोबिलिटी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

Best New Tyre
Rice Risk: सतत भात गरम करून खाताय? वेळीच सवय मोडा, नाहीतर गंभीर आजाराला द्याल आमंत्रण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com