Kidney Failure Symptoms: किडनी निकामी होण्याआधी हे ३ गंभीर आजार देतात अलर्ट; तज्ज्ञांनी सांगितली नेमकी कारणं, वेळीच व्हा सावध

Diabetes And Kidney Health: डायबेटीज आणि उच्च रक्तदाब यांसारखे आजार किडनी निकामी होण्याचा धोका वाढवतात. तज्ज्ञांच्या मते, योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात.
Kidney Failure Prevention
Kidney Failure Preventiongoogle
Published On

सध्याच्या लाइफस्टाईलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोक कधीही उठतात, कधीही जेवतात आणि कधीही झोपतात. दिवसातल्या याच शरीरासाठी महत्वाच्या असणाऱ्या क्रिया त्या वेळेत पूर्ण करत नाहीत. त्यामुळे त्यांना जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागते. कामाचा ताण जरी वाढत असला तरी काही गोष्टींच्या वेळा आणि सवयी आपण वेळोवेळी फॉलो केल्या पाहिजेत. नाहीतर लोकांना कमी वयातच हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.

डायबेटीज, हाय ब्लड प्रेशर आणि किडनी निकामी होणे हे आजार एकमेकांशी जोडलेले असतात. तुमच्या बदल्या लाइफस्टाईलमुळे, खाण्या पिण्याच्या सवयींमुळे अनेकांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. हे त्यापैकी काही आजार आहेत जे तिशीतच लोकांना त्रास देतात. जर डायबेटीज, हाय ब्लड प्रेशर आणि किडनीच्या समस्या वाढल्या तर तुमच्या रक्तवाहिन्यांवर आणि किडनीवर परिणाम होऊ शकतो. त्यात मोठी समस्या म्हणजे या समस्यांची लक्षणे ओळखून येत नाहीत. बऱ्याचदा ती ठळक दिसत नाहीत. याने हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

Kidney Failure Prevention
Fitness Without Jym: जिमला वेळ नाही? फक्त 20 मिनिटांची ही सवय 30 दिवसांत बदलेल तुमचं शरीर

डायबेटीजमध्ये शरीरातल्या शुगरचे प्रमाण वाढते. त्याने शरीरातल्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. किडनीमध्ये असलेल्या सूक्ष्म गाळण्याच्या यंत्रणा म्हणजे नेफ्रॉन्स हळूहळू निकामी व्हायला सुरुवात होते. त्याने शरीरातली घाणेरडी द्रव्ये बाहेर जात नाहीत. मग किडनीवर ताण येऊ शकतो. याने भविष्यात किडनी निकामी होण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.

ब्लड प्रेशर, डायबेटीज आणि किडनी या तिन्ही आजारांचे काही गंभीर परिणाम आहेत. जास्त वजन, कमी व्यायाम, जास्त मीठ आणि शुगर फ्री आहार, धूम्रपान, मद्यपान, वाढतं वय आणि कुटुंबातला इतिहास हे सर्व कारणीभूत ठरू शकतं. तज्ञांच्या मते, जीवनशैलीत बदल केल्याने या तिन्ही आजारांवर नियंत्रण मिळवता येतं. त्यासाठी वजन नियंत्रणात ठेवा, पौष्टीक आहार घ्या, दररोज किमान ३० मिनिटं व्यायाम करा, धूम्रपान संपूर्ण टाळा आणि मद्यपान मर्यादित ठेवा, याने नक्कीच तुम्हाला चांगले हेल्दी आयुष्य जगता येईल.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Kidney Failure Prevention
Wednesday Horoscope: पैशाचे व्यवहार टाळा; ५ राशींच्या व्यक्तींसाठी प्रियकराकडून मिळेल खास भेट; वाचा राशीभविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com