Sakshi Sunil Jadhav
आजच्या धावपळीच्या जीवनात जिमला जाण्यासाठी वेळ काढणे अनेकांना शक्य होत नाही. पण फिट राहण्यासाठी जिमच आवश्यक आहे, असे नाही.
दररोज फक्त २० मिनिटे स्वतःसाठी दिली तरी तुम्ही तंदुरुस्त आणि ऊर्जावान राहू शकता. जाणून घ्या घरबसल्या फिट राहण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय.
फक्त 5 मिनिटे जागेवर धावा, जंपिंग जॅक्स आणि हलके स्ट्रेचिंग केल्याने शरीर सक्रिय होते आणि दिवसाची सुरुवात ऊर्जेने होते.
दररोज 10-12 सूर्यनमस्कार केल्यास शरीरातील सर्व स्नायू कार्यरत होतात. वजन नियंत्रण, लवचिकता आणि मानसिक शांततेसाठी हा उत्तम पर्याय आहे.
पुश-अप्स, स्क्वॅट्स, प्लँक आणि लंजेस यांसारखे व्यायाम जिमशिवायही ताकद वाढवतात. प्रत्येकाचा 2-3 सेट करा.
दोरीने 5-7 मिनिटे उड्या मारल्याने कॅलरी जलद बर्न होतात आणि कार्डिओ फिटनेस सुधारतो.
लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर करा. दिवसातून 10 मिनिटे जिने चढल्यास हृदय व स्नायू मजबूत होतात.
ऑफिस किंवा घरात दीर्घकाळ बसून काम करत असाल, तर प्रत्येक तासाला 2-3 मिनिटे उभे राहून स्ट्रेचिंग करा. यामुळे पाठदुखी आणि थकवा कमी होतो.
फिटनेससाठी व्यायामाइतकेच संतुलित आहार महत्त्वाचा आहे. जंक फूड टाळा, भरपूर पाणी प्या आणि प्रथिनेयुक्त आहार घ्या.
दररोज 5 मिनिटे प्राणायाम किंवा ध्यान केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.