Kidney Failure: वारंवार थकवा जाणवतो? किडनी निकामी होण्याचे असू शकते लक्षण, वेळीच व्हा सावध अन् वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Early Signs of Kidney Disease: सतत थकवा, सूज आणि लघवीतील बदल ही किडनी आजाराची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. वेळीच तपासणी व तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
Early Signs of Kidney Disease
Kidney Failure Symptomsgoogle
Published On

बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोक बाहेर खाणं मोठ्या प्रमाणात पसंत करतात. अर्थात बाहेर गेल्यावर कोणीच घरी बनवले जाणारे पदार्थ खात नाही. त्याचा थेट परिणाम तुमच्या किडनीवर होतो. पण तुम्हाला माहितीये का? जेव्हा तुमची किडनी निकामी होते, तेव्हा तुम्हाला ती काही संकेत देत असते. ती वेळीच ओळखून त्यावर उपचार करणं महत्वाचं असतं.

किडनी हा शरीरातला महत्त्वाचा अवयव असतो. जो रक्तामध्ये असणारे घाणेरडे घटक गाळण्याचं काम करतो, इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवतो आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचं काम करतो. पण जेव्हा हा अवयव खराब होतो तेव्हा याची लक्षणे फारशी कळून येत नाहीत. याला तज्ज्ञ ‘सायलेंट किलर’ म्हणतात.

Early Signs of Kidney Disease
Winter Weight Gain: थंडीच्या दिवसात वजन वाढतंय?झटपट...खाण्यापिण्यात करा ४ बदल, कमी होईल पटापट

किडनी जेव्हा खराब होते तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात थकवा, पाणी कमी पिण्यामुळे येणारा अशक्तपणा जाणवतो. हाय ब्लड प्रेशर, डायबेटीज, कौटुंबिक आजाराचा इतिहास, लठ्ठपणा, त्रासदायी औषधांचा अतिवापर, धूम्रपान आणि मद्यपान ही किडनीच्या आजाराची प्रमुख कारणं मानली जातात.

तुम्हाला या आजारात लघवीच्या सवयींमध्ये बदल जाणवतो, लघवीचं प्रमाण कमी-जास्त होतं, लघवीत फेस दिसतो किंवा लघवी वाटे रक्त जातं हे किडनी खराब होण्याचे लक्षण असू शकतं. तसेच पाय, गुडघे किंवा चेहऱ्यावर सूज येणे हे शरीरात द्रव साचत असल्याचं लक्षण आहे. हे किडनी खराब झाल्याचं लक्षण असू शकतं. असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

रक्तात विषारी घटक साचल्यामुळे सतत थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, तसेच सकाळी डोळ्याभोवती सूज येते हे सुद्धा गंभीर संकेत मानले जातात. यासोबतच अचानक रक्तदाब वाढत असेल तर तुम्ही वेळीच तज्ज्ञांकडे जावून उपचार करणं गरजेचं आहे. अन्यथा ही समस्या तुमच्या जीवावर बेतू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Early Signs of Kidney Disease
Maagh Pornima 2026: माघ पौर्णिमेला करा हे 5 उपाय; पैशाची तंगी होईल कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com