Sakshi Sunil Jadhav
हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. गंगास्नान, दान, पूजा आणि विशेष उपाय केल्याने या दिवशी घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
हिंदू पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ०३:४५ वाजता सुरू होऊन १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ०३:२५ वाजता समाप्त होईल. स्नान व पूजेसाठी सकाळी ०५:३० ते ०७:१० हा अमृत काळ असेल.
पौर्णिमेला शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करा. घरी स्नान करताना पाण्यात गंगाजल मिसळा. स्नानानंतर तांब्याच्या कलशातून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. याने आरोग्याच्या समस्या कमी होतील.
माघ पौर्णिमेच्या संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना तुपाचे दिवे लावा.
पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा अभिषेक करा. रात्री लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा. याने आर्थिक अडचणी दूर होतात.
माघ पौर्णिमेला तीळ, गूळ, तूप, चादर किंवा अन्न गरजू व्यक्तींना दान करा. या दानामुळे पितृदोष दूर होतो आणि पुण्य प्राप्त होतं.
संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि ११ प्रदक्षिणा घाला. यामुळे घरात सुख-समृद्धी आणि मानसिक शांती नांदते.
पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात बसून किमान १०८ वेळा “ॐ सों सोमाय नमः” हा मंत्र जप केल्यास मनातील नकारात्मकता दूर होते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.