Rice Risk: सतत भात गरम करून खाताय? वेळीच सवय मोडा, नाहीतर गंभीर आजाराला द्याल आमंत्रण

Rice Health Risk: गरम केलेला किंवा शिळा भात वारंवार खाण्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. बॅक्टेरिया आणि विषारी घटकांमुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
steame rice side effects
reheated rice health riskgoogle
Published On

माणसाला अन्नाची गरज असते. ही आपली मुलभूत गरज मानली जाते. आपण रोज उठतो नाश्ता करतो मग कामाला सुरुवात करतो. म्हणजेच आपल्या शरीरात जेव्हा अन्न जातं तेव्हा आपल्याला ताकद मिळते. त्यात ताकदीने आपण दिवसभरातली कामे करु शकतो. त्यात प्रत्येकाच्या आहारात कोणते पदार्थ असतात? याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यात जर फायबर, प्रोटीन आणि जीवनसत्व मिळणारे घटक नसतील तर तुम्हाला शरीर इतर कामं करायला साथ देत नाही.

बऱ्याचदा लोक उत्तम अन्न रोजच्या आहारात घेतात. पण त्यांच्या एका चुकीमुळे त्यांना अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. ती समस्या म्हणजे लोक वरण भात रोजच्या आहारात घेतात. पण जेव्हा जेवणाची वेळ असते, तेव्हा तो पुन्हा करून घातात. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही जर ही सवय बंद केली नाही तर तुमच्या शरीराला याचा धोका निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा आपण जेवताना भात गरम करुन खातो. हा त्यातला प्रमुख धोका आहे असं आपण म्हणू शकतो.

steame rice side effects
Kidney Failure Symptoms: किडनी निकामी होण्याआधी हे ३ गंभीर आजार देतात अलर्ट; तज्ज्ञांनी सांगितली नेमकी कारणं, वेळीच व्हा सावध

भात हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये केला जाणारा पदार्थ किंवा आहार आहे. हा पदार्थ बनवताना जेव्हा भात शिजतो त्याच वेळेस त्यातले बॅक्टेरिया मरतात. पण बॅसिलस सेरिलयचे बिजाणू खूप काळ टिकणारे असतात. जे उष्णतेतही त्यामध्ये असतात, मरत नाहीत. जर तुम्ही शिजवलेला भात दोन तासांपेक्षा जास्त वेळ ठेवला तर हे बिजाणू वाढतात आणि त्याचा विषारी पदार्थ तयार होतो. जर तुम्ही पुन्हा हा भात गरम केला तर पुन्हा बॅक्टेरिया मरतात. पण आधीच तयार झालेले विषारी पदार्थ टिकतात. याने तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात.

त्यामुळे भात पुन्हा पुन्हा गरम करणं टाळा. जेव्हा तुम्हाला भात खायचा असेल तेव्हाच बनवून घ्या. कारण भात बनवायला जास्त वेळ लागत नाही. याने तुम्हाला त्यातले प्रोटीन गुणधर्म मिळू शकतील. नाहीतर तुम्हाला पोटात गडबड जाणवू शकते. त्याचे कारण तुम्हाला कळणारही नाही. जेव्हा तुम्ही हा भात खाल त्याच्या १ ते ६ तासांनंतर ही लक्षणं तुम्हाला दिसतील. त्यामध्ये उलट्या, मळमळ, पोटदुखी किंवा पोटात कळा, डायरिया आणि कधीकधी ताप अशा समस्या जाणवू शकतात. त्यामुळे ताजा भात खाणं तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकते.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

steame rice side effects
Eyebrow Shape Tips: चेहऱ्यानुसार आयब्रोचा शेप कसा निवडावा? सुंदर अन् रेखीव डोळ्यांसाठी खास टिप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com