

एसआयटीने ऑनलाईन सुनावणीची मागणी केली
न्यायालयाने विनंती मान्य केली
सुनावणी आता व्हर्च्युअल पद्धतीने होणार
अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार होत. मात्र आता सुनावणीसाठी खरातला न्यायालयात आणलं जाणार नाहीये. न्यायालयात हजर न करता ऑनलाइन पद्धतीने सुनावणी घेतली जाणार आहे. भोंदू बाबा अशोक खरातच्या जीवाला धोका असल्यानं एसआयटीनं न्यायालयाकडे ऑनलाईन सुनावणी करण्यात यावी असं विनंती केली होती. खरातच्या सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने एसआयटीची विनंती मान्य केली आहे.
पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर अशोक खरातला बुधवारी १४दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र तपास अधिकाऱ्यांनी लैंगिक अत्याचाऱ्याच्या दुसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळण्याची विनंती अर्ज सादर केला. त्यानंतर न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर अशोक खरातला मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा एसआयटीच्या पथकाने ताब्यात घेतलं. आज न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र खरातच्या सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाने ऑनलाइन पद्धतीने सुनावणी होणार आहे. एसआयटीने न्यायालयाला सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाइन सुनावणी घ्यावी, असे पत्र दिलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.