प्रसादाच्या गुंगीतून लैंगिक शोषण; SITच्या चौकशीत अशोक खरातचे भयंकर कारनामे उघड, VIDEO

ashok Kharat news : अशोक खरातचे कारनामे काही थांबण्याचं नाव नाही... अशातच शोषण करण्याआधी खरात महिलांना प्रसाद देत असल्याचं समोर आलयं... मात्र या प्रसादात खरात नेमकं काय मिसळायचा? खरातच्या प्रसादाचं गूढ नेमकं काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Ashok Kharat News
Ashok KharatSaam tv
Published On

56 अश्लील व्हिडिओ, 11 तक्रारी आणि अनेक महिलांच्या आयुष्याशी खेळणारा खरात आता एसआयटीच्या कचाट्यात चांगलाच अडकलाय...खरातच्या पाशवी कृत्यांबद्दल एक एक धक्कादायक माहिती उघडकीस येत असताना, महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांना गुंग करण्यासाठी खरात प्रसादाचा वापर करायचा ? पीडित महिलांनीही तक्रारीत प्रसाद खाल्यानंतर शुद्ध हरपल्याचं म्हटलंय.

Ashok Kharat News
Ashok Kharat: पतीला बाहेर बसवायचा आणि केबिनमध्ये गर्भवती महिलेसोबत...; खरातचा आणखी एक कारनामा आला समोर

खरात ऑफिसमध्ये येणाऱ्या महिलांना खाण्यासाठी पेढा आणि पिण्यासाठी खारट किंवा कडवट चवीचे पाणी देत असे. हे पदार्थ सेवन केल्यानंतर महिलांना गरगरणे, मळमळ होणे तसेच डोके जड झाल्यासारखे वाटत असे. त्यांची शुद्ध हरपून त्या आरोपीच्या प्रभावाखाली येत असल्याचं समोर आलंय. त्यानंतर खरात ऑफिसमधील दिवे बंद करून महिलांवर लैगिक अत्याचार करायचं. कौटुंबिक कलह, मूल न होणे, आर्थिक चणचण किंवा वैवाहिक समस्या अशा अडचणीत सापडलेल्या महिलांना खरात हेरायचा. त्यांचा विश्वास जिंकून तो त्यांना संमोहित करायचा..

Ashok Kharat News
चांगल्या आयुष्यासाठी असेल तर मला तुझं...; उच्चशिक्षित महिलांच्या रांगा, योनी शुद्धीकरण, खरातचा धक्कादायक कारनामा उघड

खरात प्रसादातील पेढ्यात आणि पाण्यात कोणते रसायन किंवा घटक मिसळत होता, हे अद्याप समोर आलेलं नाही. खरातनेही या गूढ औषधाबद्दल SIT तपासात कोणतीच माहिती अद्याप दिली नसल्याचं सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी कोर्टात सांगितलयं. त्यामुळे खरात देत असलेल्या प्रसादाबद्दलचा गूढ आणखी वाढत चाललंय. आता पोलिसच खरातला खाकी हिसक्याचा प्रसाद देऊन गुंगीचं गूढ उलगडणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com