Wardha ST Bus Accident : कारंजा राष्ट्रीय महामार्ग भरधाव एसटी बसने तब्बल ११ शेळ्यांना चिरडलं, अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

Shocking Video : वर्ध्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ज्यात भरधाव वेगात येणाऱ्या बसने शेळ्यांना चिरडलं. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Shocking Video
Wardha ST Bus Accident Saam Tv
Published On

चेतन व्यास, वर्धा.-साम टीव्ही

वर्धा जिल्ह्याच्या कारंजा येथील राष्ट्रीय महामार्गवरील टोलनाका परिसराजवळ भरधावं एसटी बसने रस्ता ओलांडणाऱ्या शेळ्यांना चिरडले. या घटनेत तब्बल अकरा शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना परिसरातील हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झालीये. धडक इतकी भीषण होती की बस पलटी होता होता थोडक्यात बचावली. सध्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Shocking Video
Shocking News : हातात मेहंदी, कोर्ट मॅरेजची तयारी... अचानक लग्नाला नकार दिला, डॉक्टर गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला

नागपूर येथून एम एच ४० सीएम ४९६७ क्रमांकाची बस महामार्गाने अमरावतीला(amravati) जातं होता. या दरम्यान कारंजा येथील चक्री घाट परिसरातील शिवकृपा हॉटेलजवळ रस्ता ओलांडणाऱ्या शेळ्यांच्या कळपाला भरधावं बसने चिरडले. बससमोर अचानक शेळया आल्याने यातील अकरा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला तर काही शेळ्या बचावल्या.

सुदैवाने भरधावं असलेली बस(Bus ) चालकाने नियंत्रित केल्याने पलटी होण्यापासून बचावली यामुळे बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाहीय. या घटनेमुळे शेळी मालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर काही वेळ रस्त्यावर मृत शेळ्या पडून असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रकरणी बसचालक आणि शेळी मालकांमध्ये आपसी समझोता झाल्याने तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती आहे. मृत शेळ्यांना परिसरात खड्डा करून पुरण्यात आले.

व्हायरल व्हिडिओत काय ?

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला महामार्ग (Highway)दिसून येत आहे. या महामार्गावरुन काही शेळ्या रस्ता ओलांडून दुसरीकडे येताना दिसत आहे. मात्र काही वेळात याच महामार्गावरुन भर वेगात एक बस येते आणि बसचा वेग जास्त असल्याने त्यातील काही शेळ्या चिरडल्या जाताना दिसून येत आहे.संपूर्ण घटना जवळील असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Shocking Video
Shocking Video : मित्र वणव्यामध्ये...! धबधब्यात पोहताना अचानक पँटीत साप शिरला; मित्रांनी जीव वाचवला, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com