Amarnath Yatra 2024 : जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस, अमरनाथ यात्रा तातडीने थांबवली; महामार्ग पडले बंद

Amarnath Yatra postponed अमरनाथ यात्रेवरही पावसाचा परिणाम झाला आहे. पहलगाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
Amarnath Yatra
Amarnath Yatra 2024Saam Tv
Published On

मान्सूनच्या जोरदार आगमनानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये मुसळधार पाऊस सुरु झालेला आहे. याच मुसळधार पावसामुळे आणि खराब हवामानामुळं अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आलेली आहे. अमरनाथ यात्रा सध्या तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. यानंतर संपूर्ण परिस्थिती पाहता तेथील परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर यात्रा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम आणि बालटल मार्गावरुन अमरनाथ (Amarnath)येथील पवित्र गुहेपर्यंत तुर्त थांबवण्यात आली आहे. पहलगाममध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र मुसळधार पावसातही अमरनाथ यात्रा सुरुच राहिली. अमरनाथ यात्रेला आलेल्या भाविकांमध्ये बाबा बर्फानी यांचे दर्शन घेण्यासाठी मोठा उत्साह होता. साधारण २१ हजारांहून अधिक आलेल्या भाविकांनी पवित्र अशा अमरनाथ गुहेत बाबा बर्फानीचे दर्शन घेतले.

पवित्र गुहेकडे जाण्याची परवानगी स्थगित

सध्या जम्मू -काश्मीरमध्ये पडणारा पाऊस(Rain) भाविकांसह तेथील स्थानिक नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे दिसते. पंरतू सध्या पडणाऱ्या पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून मिळाली आहे. हवामान खात्याचा हा अंदाज लक्षात घेता प्रशासनाने अमरनाथ यात्रा सध्या स्थगित केली आहे. अमरनाथ आलेल्या कोणत्याही भाविकाला नुनवान बेस कॅम्प या ठिकाणावरुन चंदनवारी अक्षमार्गे गुहेकडे जाण्याची परवानगी नाही.

अमरनाथ यात्रेदरम्यान हवामान (weather)सुधारताच ही यात्रा पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेला आलेल्या प्रत्येक भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी करुन ठेवली आहे शिवाय तेथे तात्पुरती रुग्णालयेही उभारण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com