Pimpri Chinchwad Accident: चालकाचं नियंत्रण सुटलं अन् स्कूल बस थेट पुलाच्या कठड्याला धडकली; नागरिकांनी ७० विद्यार्थ्यांना 'असं' वाचवलं, थरारक VIDEO

School Bus Collided To Indrayani River Bridge: पिंपरी चिंचवडमध्ये एका स्कूल बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये स्कूल बस इंद्रायणी नदीच्या पुलाच्या कठड्याला धडकल्याची घटना घडली आहे.
स्कूल बसचा भीषण अपघात
School Bus Accidentsaam tv
Published On

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भोसरी आळंदी रोडवर एका स्कूल बसचा काल ४ जूलै रोजी विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. भोसरी आळंदी रोडवर चरोली फाटा येथे स्कूल बस थोडक्यात नदीत पडण्यापासून वाचल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. नेमकी काय घटना घडली ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.

नेमका अपघात कसा घडला?

स्कूल बस भोसरी आळंदी रोडवरून जात (School Bus Accident) होती. त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं अन् बस थेट इंद्रायणी नदीच्या पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. ज्यावेळी अपघात झाला, त्यावेळेस स्कूल बसमध्ये जवळपास ७० विद्यार्थी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

काळजात धडकी भरवणारी घटना

या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली (Indrayani River) नाही. दैवबैलवत्तर म्हणून बस नदीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचली आहे. काळजात धडकी भरवणारी ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. या बसमध्ये जवळपास ७० विद्यार्थी होते. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. परंतु या घटनेत कोणालाही दुखापत झालं नसल्याचं समोर आलंय.

स्कूल बसचा भीषण अपघात
Mumbai Flyover Accident : भरधाव दुचाकी पूलावरून २० फूट खाली कोसळली; पहाटेच्या भीषण अपघातात २ तरुणांचा मृत्यू

इंद्रायणी नदीच्या पुलावर दुर्घटना

ज्यावेळी हा अपघात झाला, त्यावेळी बसमध्ये जवळपास साठ ते सत्तर विद्यार्थी प्रवास करत होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांनी अपघात झाल्यानंतर बसची काच फोडून बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढून बचाव कार्य केलं (Pimpri Chinchwad News) आहे.

चरहोली येथील दाभाडे चौकाजवळील इंद्रायणी नदीच्या पुलावर ही दुर्घटना घडली. अपघात झालेली बस ही लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या अपघातामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये स्कूल बस सुरक्षेविषयी पुन्हा एकदा भीती निर्माण झाली (Accident Video) आहे.

स्कूल बसचा भीषण अपघात
Gondia Accident: लाडकी बहीण योजनेचा फार्म भरायला जाणाऱ्या भावाचा अपघात; उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com