मित्र वणव्यामध्ये...! धबधब्यात पोहताना अचानक पँटीत साप शिरला; मित्रांनी जीव वाचवला, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
snake entered in pants :Saam tv

Shocking Video : मित्र वणव्यामध्ये...! धबधब्यात पोहताना अचानक पँटीत साप शिरला; मित्रांनी जीव वाचवला, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

snake entered in pants : धबधब्याजवळ एका तरुणासोबत विचित्र घटना घडली. पाण्यात पोहायला गेलेल्या तरुणाच्या पँटीत अचानक साप शिरल्याची घडली. या घटनेने त्याच्या मित्रांमध्ये खळबळ उडाली.
Published on

मुंबई : पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेक तरुणांना पावसाळी पर्यटनाची ओढ लागते. अनेक तरुण पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यावर जातात. जंगलात, झाडाझुडपात असलेल्या निसर्गरम्य धबधब्याचा तरुण मंडळी आनंद घेतात. या धबधब्याच्या ठिकाणी जाणे काही पर्यटकांच्या जीवावर देखील बेतते. तर झाडाझुडपातील धबधब्यांमध्ये तरुणांना सापाचाही सामना करावा लागतो. असाच प्रकार धबधब्याजवळ एका तरुणासोबत झाल्याची घटना घडली आहे.

पावसाळा सुरु झाल्याने सर्व तरुण मंडळींची पावले धबधब्याच्या ठिकाणी वळू लागले आहेत. अशाच धबधबा आणि पाण्याच्या ठिकाणी जाणाऱ्या तरुणांसोबत धक्कादायक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या लोणावळ्यातील भूशी डॅमला फिरायला गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर काल ताम्हिणी घाटातही एक तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. धबधब्याच्या ठिकाणी तरुणांसोबत भयंकर घटना घडू लागल्या आहेत. असाच एक प्रकार एका तरुणासोबत घडला. मात्र, या घटनेतून तरुणाचा जीव थोडक्यात वाचला.

मित्र वणव्यामध्ये...! धबधब्यात पोहताना अचानक पँटीत साप शिरला; मित्रांनी जीव वाचवला, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
Khel Paithanicha Viral Video : पैठणीचा खेळ रंगला; जिंकण्यासाठी दोन वहिनी स्टेजवर भिडल्या, कुस्तीचा VIDEO व्हायरल

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

मित्रांसोबत धबधब्यात पोहोयला गेलेल्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला. तरुण हा धबधब्याच्या खड्ड्यातील पाण्यात पोहत होता. तरुण पोहत असताना त्याच्या पँटीत अचानक साप शिरला. पाण्यात पोहताना पँटीत साप शिरल्याचे कळताच तरुण पाण्याबाहेर आला. त्याच्या मित्रांनी हा साप पाहिला. या तरुणाने पँटीत शिरलेल्या सापाचे डोके दाबून धरले. तर पँटीत शिरलेला साप त्याचे मित्र काढू लागले.

सापाला पाहून त्याच्यासहित त्याचे सर्व मित्र घाबरले होते. मात्र, ते मित्राचा जीव वाचण्यासाठी सापाला पँटमधून बाहेर खेचत होते. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याच्या मित्राने जोर लावून साप पँटीच्या बाहेर खेचला. त्यानंतर या मित्रांनी सापाच्या तावडीतून मित्राची सुटका केली. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा धक्कादायक थरार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मित्र वणव्यामध्ये...! धबधब्यात पोहताना अचानक पँटीत साप शिरला; मित्रांनी जीव वाचवला, घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
Tamhini Ghat Viral Video : ताम्हिणी घाटात तरुण गेला वाहून; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ तुफान व्हायरल

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ नेमक्या कोणातील भागातील आहे, हे कळू शकलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ भारताबाहेरचा असण्याची देखील शक्यता आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून शेकडो प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच तरुणासोबत घडलेला भयंकर प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com