पावसाळा सुरू असल्याने सध्या अनेक पर्यटक धबधब्याखाली पावसाचा आनंद घेतना दिसत आहेत. अशात दोन दिवसांपूर्वी येथे धबधब्यात पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेला एक तरुण वाहून गेला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्याला पाण्यातून बाहेर पडणे कठीण झाले आणि तो वाहून गेला. या घटनेचा थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही तरुण येथे फिरण्यासाठी आले आहेत. त्यातील एक जण पाण्याचा प्रवाह पार करून एका खडकावर बसला आहे. मित्राला पाहून हा तरुण देखील पाण्यात उडी घेतो. मात्र तितक्यात पाण्याचा प्रवाह आणखी वाढतो. पाणी वाढल्यावर हा तरुण दगडांचा आधार घेऊन स्वतःचाला वाचवण्याचा प्रयत्न करतो.
मात्र या प्रयत्नात तरुण अपयशी ठरतो. समोर एका खडकावर बसलेला तरुण आपला मित्र संकटात आहे हे पाहून कासावीस होतो. पाण्याचा प्रवाह जास्त आहे आणि तो वाहून जात आहे हे पाहून खडकावर बसलेल्या मित्राला त्याला वाचवावं, मदत करावी असं वाटतं. मात्र पाणी जास्त प्रमाणात वाढल्याने त्याला हे धाडस करता येत नाही.
थोड्याशा मौजमजेसाठी या तरुणाने पाण्यात उडी घेतली मात्र आता यामध्ये त्याचा जीव गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण रायगडमधील देवकुंड धबधब्याच्या डोहात एक अनोळखी मृतदेह सापडला आहे. ताम्हिणी घाटातील डोंगर भागातील वाहून गेलेल्या तरुणाचा हा मृतदेह असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दोन दिवसांपूर्वी लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात सुद्धा अशीच घटना घडली. या घटनेत एका कुटुंबातील ५ जण पाण्यात वाहून गेलेत. भुशी डॅमच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगर परिसरात हे सर्वजण फिरण्यासाठी आले होते. यामध्ये ४ मुलं आणि एक महिला असं अख्ख कुटुंब वाहून गेलं आहे. यातील ४ जणांचे मृतदेह काली तपासात सापडले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.