Amravati News : धक्कादायक..अमरावती जिल्ह्यात जून महिन्यात २४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

Amravati News : जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाले. यामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली. दरम्यान जून महिना उलटला. परंतु अद्यापही अमरावती जिल्ह्यात समाधानकारक पाऊस बरसला नाही
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 

अमरावती : खरीप हंगामाला सुरवात होत असतानाच अमरावती जिल्ह्यात धक्कादायक वास्तव समोर येत आहे. पावसाने सुरवातीला हजेरी लावल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. शिवाय डोक्यावर असलेला कर्जाचा आर्थिक बोजामुळे शेतकरी बेजार झाला आहे. यातूनच एकट्या अमरावती जिल्ह्यात एकाच महिन्यात तब्बल २४ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 

Amravati News
Ashadhi Yatra : चंद्रभागेच्या तीरावर चार लाख भाविकांची होणार सोय; ६५ एकरचा परिसर केला विकसित

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाले. यामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली. दरम्यान जून महिना उलटला. परंतु अद्यापही अमरावती (Amravati) जिल्ह्यात समाधानकारक पाऊस बरसला नाही. काहींनी हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी केली. तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाअभावी रखडलेल्या आहेत. अशा बिकट परिस्थितीत असलेल्या काही (Farmer) शेतकऱ्यांनी मात्र टोकाचे पाऊल उचलत जीवन यात्रा संपवल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अमरावती जिल्ह्यात जून महिन्यात २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने चांगलीच खळबळ उडलेली आहे. 

Amravati News
Shegaon News : शेगावमध्ये गणेशोत्सवासह इतर मिरवणुकीमध्ये डीजे बंदी; न वाजवण्याची शपथ, मंडळांना मिळणार ५१ हजाराचे बक्षीस

सहा महिन्यात १७० आत्महत्या 

बळीराजा हा शेतीसाठी हातउसनवारीचे पैसे घेतो किंवा बँकेचे कर्ज काढत असतो. मात्र पावसाच्या (Rain) लहरीपणामुळे शेतातून येणाऱ्या उत्पन्नाचे गणित बिघडले. तर दुसरीकडे शेतमालाला चांगला दर मिळत नाही. यामुळे कर्ज फेडीची विवंचना असते. यातून शेतकरी टोकाचा निर्णय घेत असते. अमरावती जिल्ह्यात महिनाभरात २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर जानेवारी ते जून या सहा महिन्यात १७० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. एकंदरच पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याचे सत्र काही थांबता थांबेना.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com