Ashadhi Yatra : चंद्रभागेच्या तीरावर चार लाख भाविकांची होणार सोय; ६५ एकरचा परिसर केला विकसित

Pandharpur News : आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात दरवर्षी १५ ते १६ लाख भाविक दाखल होत असतात. येथे येणाऱ्या भाविकांना प्रशासनाच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात
Pandharpur Chandrabhaga River
Pandharpur Chandrabhaga RiverSaam tv
Published On

पंढरपूर : आषाढी यात्रेनिमित्ताने पंढरपुरात होणाऱ्या गर्दीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी प्रशासनाने चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर ६५ एकर परिसर विकसित केला आहे. या परिसरामध्ये जवळपास चार लाख भाविकांची राहण्याची सोय केली आहे. येथे पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यामधील वारकऱ्यांना देखील राहण्याची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे वाळवंट व पंढरपूर परिसरातील होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

Pandharpur Chandrabhaga River
Milk Price : दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; तासगाव तहसीलवर जनावरांसह मोर्चा, अकोले तालुक्यात शेतकऱ्यांनी केले मुंडन

आषाढी यात्रेच्या (Ashadhi Wari) निमित्ताने पंढरपुरात दरवर्षी १५ ते १६ लाख भाविक दाखल होत असतात. येथे येणाऱ्या भाविकांना प्रशासनाच्या वतीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. पंढरपूर शहरातील व वाळवंटातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने मागील तीन- चार वर्षांपासून (Chandrabhaga River) चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर असलेल्या ६५ एकर परिसरामध्ये वीज, पाणी, दिवाबत्ती, आरोग्य यासह इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. येथे जवळपास ८०० हून अधिक दिंड्या व पालख्यांना राहण्याची सोय केली आहे.  

Pandharpur Chandrabhaga River
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफे चालकांकडून लूट; जास्तीचे पैसे घेत असल्याचा आरोप

४ लाख भाविकांची सोय 

आषाढी एकादशी (Pandharpur) आता पंधरा दिवसांवर आहे. भाविकांची आतापासून गर्दी होऊ लागली आहे. या दृष्टीने प्रशासन व मंदिर समितीकडून तयारी पूर्णत्वास नेण्यात येत आहे. आलेल्या भाविकांना राहण्याची सुविधा देखील करण्यात आली आहे. चंद्रभागा तीरावर करण्यात आलेल्या सुविधेत जवळपास चार लाखाहून अधिक भाविक येते राहू शकतील अशी व्यवस्था केली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com