कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सध्या त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे चांगलेच चर्चेत आहेत. महिला लैंगिक अत्याचाराच्या दोन गंभीर प्रकरणांचा छडा लावत त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. भोंदू बाबा अशोक खरातला अटक करण्यासाठी केलेला प्लॅन असो किंवा TCS कंपनीतील धर्मांतर आणि महिलांवर अत्याचार प्रकरण असो कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पोलिसांनी त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. अशोक खरात पळून जाण्याच्या शक्यता असताना त्याच्या घरात चोर शिरल्याचा बहाणा करून त्याच्या घरात प्रवेश करण्याची युक्ति संदीप कर्णिक यांनीच दिली होती. ज्यामुळे खरातच्या मुसक्या आवळणे शक्य झाले होते.
सोशल मीडियावर कारवाई
खरातच्या कार्यालयातून महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याप्रकरणी 65 सोशल मिडिया अकाऊंटसवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
TCSच्या बीपीओ युनिटमध्ये धर्मातराचा प्रकार आणि महिला कर्मचाऱ्यांच्या छळाचे प्रकरण अंडरकवर ऑपरेशनद्वारे उघडकीस आणले. फेब्रुवारी 2026 मध्ये या प्रकरणाबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर कर्णिक यांनी विशेष मोहीम आखली. यामध्ये 6 महिला पोलिस अधिकाऱ्यांनी तब्बल 40 दिवस संबंधित कंपनीत हाऊसकीपिंग आणि इतर कर्मचारी म्हणून काम केले. या काळात त्यांनी ठोस पुरावे गोळा केले याची कोणालाही कुणकुण देखील लागून दिली नाही आणि यशस्वी कारवाई केली.
महिला सुरक्षेच्या बाबतीत कर्णिक यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे त्यांची तुलना सिंघमसोबत केली जात आहे. काही दिवसापूर्वीच मार्च महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक पोलीस आयुक्तालयाला राज्यात प्रथम क्रमांकाचा मन देऊन सन्मानिक करण्यात आले होते. विशेष म्हणजे पुढील वर्षी सुरू होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी केलेली ही कामगिरी महत्वाची मानली जात आहे.
संदीप कार्णिक हे २००४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते त्यांच्या कडक शिस्तीसाठी आणि तितकेच स्मित हास्य ठेवून सर्वांशी आपुलकीने वागतात. नोव्हेंबर २०२३ मध्ये नाशिकच्या आयुक्तपदी रुजू झाल्यापासून त्यांनी तंत्रज्ञानावर आधारित तपासावर भर दिला.
शिक्षण
संदीप कर्णिक यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.ई. केल्यानंतर मार्केटिंगमध्ये एम.बी.ए. आणि पोलीस मॅनेजमेंटमध्ये मास्टर पदवी मिळवली आहे. यापूर्वी त्यांनी अहमदनगर, ठाणे, नागपूर, जालना, नांदेड आणि पुणे ग्रामीण (अधीक्षक) अशा विविध ठिकाणी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. मराठा आरक्षण हिंसाचाराच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचे (SIT) नेतृत्वही त्यांनी केले होते. तसेच २०११ च्या मावळ गोळीबार घटनेदरम्यान ते वादात सापडले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.