Mumbai Metro 9: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंचा नवीन मेट्रोतून प्रवास| VIDEO

Mumbai Metro 9 and 2B Inaugation: मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. मेट्रो ९ आणि मेट्रो २ ब च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले आहे. या मेट्रोतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिदेंनी प्रवास केला आहे.

मुंबईकरांचा प्रवास आता खूप सुखकर होणार आहे. दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रोतील दहिसर ते काशीगाव आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले टप्पा सुरु करण्यात आला आहे. मानखुर्द मेट्रो २ब मार्गिकेतील डायमंड गार्डनर ते मंडाले टप्पा १ सुरु झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले आहे. उद्यापासून ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या मेट्रोने काशीगाववरुन दहिसर मेट्रो स्थानकाला येऊन पुढे अंधेरीलाही जाता येणार आहे. यामुळे दोन मेट्रो जोडल्या जाणार आहेत. दरम्यान, या मेट्रोतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रवास केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com