Rain Alert : अवकाळी पावसाने राज्याला झोडपलं; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; कुठे,कसं असेल हवामान वाचा

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Rain Alert : अवकाळी पावसाने राज्याला झोडपलं; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; कुठे,कसं असेल हवामान वाचा
Maharashtra Today 20th March Weather Update NewsSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात अवकाळी पावसामुळे हवामानात मोठा बदल

  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येलो अलर्ट जारी

  • वादळी वारे, विजा आणि गारपीट होण्याची शक्यता

  • पिकांचे मोठे नुकसान

Maharashtra Today 20th March Weather Update News राज्यात उन्हाचा कडाका कमी होऊन पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. गेले काही दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. काल जालना, वाशीम, नाशिक, पुणे येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तसेच बहुतांश भागात गारपीट झाली. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसाला पोषक हवामान होत आहे. गुरुवारी वाशीम ३८.४ अंश, ‎‎जळगाव येथे ३७ अंश, ‎‎अकोला येथे ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली, तर धुळे येथे १५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

Rain Alert : अवकाळी पावसाने राज्याला झोडपलं; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; कुठे,कसं असेल हवामान वाचा
Rain Alert : महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट! अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपीट; फळबागा, पिकांना फटका, शेतकरी चिंतेत

IMD च्या अंदाजानुसार, आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे, मेघगर्जना, विजांसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Rain Alert : अवकाळी पावसाने राज्याला झोडपलं; 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; कुठे,कसं असेल हवामान वाचा
Sangli : नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाची निर्घृण हत्या; अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मृतदेह सापडला, सांगलीतील धक्कादायक घटना

उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.दरम्यान काल झालेल्या पावसाने राज्याला चांगलेच झोडपले. याचा फटका हंगामी फळांना आणि भाज्यांना बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे वाया गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com