Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹३००० मिळणार? फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana 3000 Rupees Installment Come Together: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही. त्यानंतर आता मार्च महिन्यात दोन्ही हप्त्याचे ३००० रुपये एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार?

फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येणार?

महिलांच्या मनात हप्त्याबाबत अनेक प्रश्न

लाजकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही. मार्च महिना सुरु झाला आहे तरीही पैसे जमा न झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे पैसे कधी येणार याची उत्कंठा लाखो महिलांमध्ये आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता रखडला, मार्चचे ₹१५०० कधी येणार? वाचा सविस्तर

लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana February-March Installment May Come Together)

लाडकी बहीण योजनेचा हप्ता मागच्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर जात आहे. फेब्रुवारीचा हप्ता जवळपास दीड महिना लांबणीवर गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मागच्या महिन्याचा हप्ता हा त्याच्या पुढच्या महिन्यात शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये दिला जातो. त्यामुळे यावेळीदेखील तेव्हाच पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. परंतु फक्त फेब्रुवारीचा हप्ता येणार की फेब्रुवारी-मार्चचा हप्ता येणार याबाबत माहिती समोर आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी लाडक्या बहि‍णींना दोन हप्ते एकत्र दिले होते. त्यामुळे यावेळेसदेखील असा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना मार्च महिन्यात १५०० रुपये मिळणार की ३००० याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! एप्रिलपासून फक्त 'या' महिलांनाच मिळणार ₹१५००; कारण काय?

फक्त या महिलांनाच मिळणार लाभ (Only These Women Will Get Ladki Bahin Yojana Benefit)

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर केवायसी केली नाही तर त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. याचसोबत ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्याचीही शेवटची तारीख ३१ मार्च आहे. त्यामुळे त्याआधी लाभार्थ्यांना केवायसीमध्ये दुरुस्ती करायची आहे. अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी! या जिल्ह्यातील २ लाख ८३ हजार महिलांचा लाभ कायमचा बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com